Shivsena (UBT) News : Sarkarnama
मराठवाडा

Shivsena (UBT) News : बीडच्या जिल्हाप्रमुखाची दोनच महिन्यात हकालपट्टी ; हे आहे कारण..

Marathwada : मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

सरकारनामा ब्युरो

Beed News : शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या शिफारशीवरून दोन महिन्यांपुर्वीच जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती झालेल्या रत्नाकर शिंदे यांची पदासह पक्षातूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. (Shivsena (UBT) News) तडकाफडकी या हकालपट्टीमागचे कारण देखील तसेच गंभीर आहे.

केज तालुक्यातील उमरी शिवारात कलाकेंद्राच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी केज पोलिसांनी काही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Beed News) यात जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांचे देखील नाव समोर आल्याने शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena) यांच्या आदेशाने शिंदे यांना पदावरून हटवले आहे.

२० मे रोजी बीड जिल्ह्यात सुषमा अंधारे यांना महाप्रबोधन यात्रे दरम्यान मारहाण केल्याचा दावा अप्पासाहेब जाधव यांनी केला होता. (Marathwada) त्यानंतर जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करत रत्नाकर शिंदे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली होती. परंतु त्यांच्यावर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

एका कलाकेंद्रावर शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी छापा मारला. यावेळी वेगवेगळ्या चार खोल्यांमध्ये काही अल्पवयीन मुली, महिला या पुरुषांसमोर नृत्य करतांना सापडल्या. यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश होता. या मुलीचे लैंगिक शोषण करून तिला वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी कारवाईत ४ अल्पवयीन मुलींसह २८ महिलांची सुटका केली. तसेच १६ पुरुषांनाही ताब्यात घेतले. हे कला केंद्र जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे चालवत असल्याचे समोर आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT