Abdul Rashid Ex Mayor Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Rashid Mamu : मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांच्या तोंडी एकच नाव संभाजीनगरचे माजी महापौर 'रशीद मामू'!

Rashid Mamu former mayor Sambhajinagar : संभाजीनगरचे माजी महापौर रशीद मामू यांचे नाव मुख्यमंत्री ते कार्यकर्त्यांपर्यंत चर्चेत, शिवसेना UBT मधील राजकीय हालचालींना वेग.

Jagdish Pansare

Municipal Corporation News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शहरातील गरम पाणी वार्डातून नगरसेवक आणि आरक्षणामुळे अनपेक्षितपणे महापौर पदावर वर्णी लागलेले माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू यांची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या तोंडी सध्या एकच नाव आहे, ते म्हणजे रशीद मामू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर 'मामूं'ना पक्षात प्रवेश दिला आणि महायुतीतील पक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडले.

रशीद मामू यांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आता 'मामू' पक्ष झाल्याची टीका, पुन्हा हिंदुत्वावर प्रश्न चिन्ह या आरोपाला उद्धव ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे आपापल्या परीने उत्तरं देत आहेत. रशीद मामू यांच्या पक्ष प्रवेशाने संभाजीनगरमधील महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी तर उद्धव ठाकरेंच्या पक्षावर टीकेचा भडीमार केलाच. पण गेल्या अनेक वर्षात गल्लीतही ओळख नसलेल्या रशीद मामू यांचे नावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सगळ्याच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या तोंडी आहे.

प्रचारानिमित्तच्या मुलाखती असो की मग जाहीर सभा गल्ली ते दिल्ली रशीद मामू यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिवाजी पार्क येथे झालेल्या आपल्या प्रचार सभेतही रशीद मामू यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्याला संजय राऊत यांनी आपल्या भाषेत प्रत्युत्तर देत 'देवेंद्र मामू' असा उल्लेख करत टोला लगावला.

अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक चारमधून उमेदवारी दिली आहे. अर्थात मामू यांच्या पक्ष प्रवेशाला शिवसेनेतील दुसरे नेते चंद्रकांत खैरे यांचा तीव्र विरोध होता. रशीद मामू यांना उमेदवारी मिळवून देणार नाही असा इशारा दिल्यानंतरही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. आता आज प्रचाराचा शेवटचा दिवस असूनही चंद्रकांत खैरे यांनी आपला हिंदुत्ववादी बाणा जपत त्यांच्या प्रचाराला न जाण्याचा निर्णय कायम ठेवला.

रशीद मामू यांचा पक्षप्रेवश शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या नव्या राजकीय खेळीचा भाग असल्याचे बोलले जाते. त्यांच्या उमेदवारीने मुस्लिम मतदारांना लोकसभेप्रमाणेच महापालिका निवडणुकीतही आपल्या पक्षाकडे आकृष्ट करण्याचा अंबादास दानवे यांचा प्रयत्न आहे. आता त्यांची ही खेळी किती यशस्वी ठरते हे 16 तारखेच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. तुर्तास रशीद मामू राज्यातील महापालिकेच्या प्रचारात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव ठरत आहे.

कोण आहेत रशीद मामू?

1988 मध्ये झालेल्या पहिल्या महापालिका निवडणुकीत कोतवालपूरा-गरमपाणी वार्डातून रशीद मामू हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 95 मध्ये दुसऱ्यांदा ते अपक्ष निवडून आले. 97-98 मध्ये अनुसूचित जमातीसाठी महापौर पद राखीव होते. पण सत्ताधारी पक्षांकडे अनुसूचित जमातीचा उमेदवारच नव्हता. त्यामुळे आरक्षण डावलून दुसऱ्या व्यक्तीला महापौर करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. तेव्हा रशीद मामू यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, निकाल त्यांच्या बाजूने लागला. पुढे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले अन् तिथेही मामू जिंकले आणि महापौर झाले.

1997 मध्ये महापालिकेत एसटी प्रवर्गासाठी महापौर पद राखीव होते. महापौर पद मिळावे यासाठी रशीद मामू यांनी न्यायालयीन लढा देत हे पद मिळवले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT