Shivsena Mla Ambadas Danve News, Aurangabad Latest Marathi News, Uddhav Thackeray Aurangabad Rally, Shivsena News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : आमचा रेकाॅर्ड आम्हीच मोडू, तुम्ही सभेला येणारी गर्दी मोजत बसा...

आम्हाला कुणी हिंदु्त्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. सत्तेपेक्षा हिंदुत्व हे कधीही आम्हाला अधिक प्रिय आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील ही भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे. (Shivsena)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिवसेनेची सभा नेहमी रेकाॅर्डब्रेकच होत आली आहे, आम्हला कोणाच्या सभेचा रेकाॅर्ड मोडायची गरज नाही. शिवसेनेची (Shivsena) सभा ऐतिहासिकच होणार, आमचा रेकाॅर्ड आम्हीच मोडू, तुम्ही फक्त सभेला येणारी गर्दी मोजत बसा, अशा शब्दात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी भाजपला लगावला आहे. राज ठाकरेंची भोंगा सभा, फडणवीसांचा जल आक्रोश मोर्चा आणि सभा याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उद्याच्या सभेकडे पाहिले जाते. (Aurangabad Latest Marathi News)

मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या सभेसाठी सज्ज झाले असून सभेला किती गर्दी होणार यांची उत्सूकता विरोधकांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांना देखील लागली आहे. (Aurangabad) भाजपने मात्र सभेला गर्दी होणार नाही, शहरातील पाणी प्रश्न चिघळल्यामुळे नागरिक या सभेकडे फिरकणार नाहीत, म्हणून शिवसेना गर्दी जमवण्यासाठी मराठवाड्यातून लोक आणत असल्याचा आरोप केला आहे.

या सगळ्या आरोपांवर आमदार अंबादास दानवे यांनी उत्तर दिले. दानवे म्हणाले, उद्धव ठाकरे यांची सभा ऐतिहासिक आणि प्रचंड होणार यात आम्हाला तिळमात्र शंका नाही. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून आमचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी ज्या पद्धतीने काम करतायेत ते पाहता ही सभा रेकाॅर्डब्रेकच होणार. आम्हाला इतर कोणाचे रेकाॅर्ड मोडण्याची गरज नाही. आमचाच रेकाॅर्ड आम्ही उद्याच्या सभेने मोडू.

सभेला गर्दी होणार की नाही? झाली तर किती होईल? याची चिंता विरोधकांनी करू नये. त्यांनी फक्त उद्याच्या सभेला होणारी गर्दी मोजण्यासाठी माणसं लावावीत. आज संपुर्ण शहर भगवेमय झाले आहे, आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक चौक भगव्या झेंड्यांनी सजवला आहे. शहरात तब्बल दहा हजार भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. शिवसेना हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे, शिवसेना म्हणजेच हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजेच शिवसेना हे लक्षात ठेवावे.

त्यामुळे आम्हाला कुणी हिंदु्त्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. सत्तेपेक्षा हिंदुत्व हे कधीही आम्हाला अधिक प्रिय आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील ही भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे. आज आम्हाला हिंदुत्व शिकवणारे अयोध्येत जेव्हा बाबरी मशिद पाडली गेली तेव्हा कुठे शेपट्या घालून लपून बसले होते. तेव्हा देशात एकच नेता असा होता ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.

ज्यांनी ठणकावून सांगितले होते की बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे. हिंदुत्वासाठी शिवसेनेच्या नेत्यांच्या आमदारक्या गेल्या, स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सहा वर्ष मतदान बंदीची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा हिंदुत्वासाठी आपले प्राण पणाला लावू शकतो. त्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वावर शंका घेण्याची गरज नाही. नागरिकांना माझे आवाहन आहे, की त्यांनी मोठ्या संख्येने उद्याच्या स्वाभीमान सभेला यावे, असेही अंबादास दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT