Suresh Nawle
Suresh Nawle  Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादिवशीच संभाजीनगरमध्ये धक्का; शिवसेनेच्या माजी मंत्र्याचा 'जय महाराष्ट्र'

Sachin Waghmare

Political News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीमधील खदखद सर्वांसमोर आली आहे. महायुतीमधील घटक पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत आहे. लोकसभेच्या जागावाटपावरून भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. तीनही पक्ष एकाद्या जागेवरच ठाम असल्याने तीन पक्षातील वाद या शिवसेना शिंदे गटाच्या माजी मंत्र्याने दिलेल्या राजीनाम्याच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

गुरुवारी छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार संदीपान भुमरे (Sandipan Pawar) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) आले होते. भुमरे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मंत्रीमंडळातील सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यातच मुख्यमंत्री शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना नेते माजी मंत्री प्रा. सुरेश नवले (Suresh Nawle) यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. (Shivsena News )

गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री शिंदे हे भाजपच्या दबावाखाली असल्याचा आरोप नवले यांनी केला. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून शिवसैनिक, शिवसेना नेते, उपनेते यांच्या मनातील भावना मी व्यक्त केलेल्या आहेत. ज्यांनी सर्वस्व पणाला लावून मुख्यमंत्र्याची सोबत देऊन त्यांचे नेतृत्व मान्य केले त्यांना उमेदवारी मिळत नसेल तर हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाचा दबाव झुगारून जे सोबत आले, त्यांना तिकीट देणे अपेक्षित होते मात्र तसे जाहले नाही.

विश्वास ठेवून सोबत आलेल्या कृपाल तुमने, हेमंत पाटील, भावना गवळी यांना उमेदवारी मिळाली नाही. यापुढे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मित्र पक्षाच्या दबावाला बळी पडत आहेत, असा दावा सुरेश नवले यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात चुकीचा संदेश जातोय

तुमच्यावर विश्वास ठेऊन जे शिवसैनिक तुमच्या सोबत आले, ते मित्र पक्षाच्या दबावामुळे आले, तुम्ही त्यांना न्याय देत नाहीत असा महाराष्ट्रात चुकीचा संदेश जातोय. शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजप सत्तेची फळ चाखत आहे. शिंदेनी उठाव केला म्हणून सत्तेच्या पालखीत भाजपला बसता आले, हे विसरून चालणार नाही असा आरोप प्रा. सुरेश नवले यांनी केला आहे.

SCROLL FOR NEXT