Parbhani loksabha news : परभणीत शिट्टी वाजणार की मशाल पेटणार? उद्या फैसला!

Mahadev Jankar Vs sanjay jadhav : स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार या दृष्टीनेही परभणीच्या लढतीकडे पाहिले जात आहे.
Mahadev Jankar, sanjay jadhav
Mahadev Jankar, sanjay jadhav Sarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभेच्या परभणी मतदारसंघात शुक्रवार 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. महायुतीचे महादेव जानकर विरुद्ध महाविकास आघाडीचे संजय जाधव यांच्यात इथे थेट लढत होत आहे. दोन्ही बाजूंनी निवडणूक प्रचाराला मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग देण्यात आला होता. याशिवाय स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार या दृष्टीनेही परभणीच्या लढतीकडे पाहिले जात आहे.

महायुतीने राष्ट्रवादीच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना परभणीतून उमेदवारी देत महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे केले. तर शिवसेना ठाकरे गटाने विद्यमान खासदार संजय जाधव(Sanjay Jadhav) यांना निष्ठेचे फळ देत सलग दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजाच्या रोषालाल सामोरे जावे लागले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahadev Jankar, sanjay jadhav
Vanchit Bahujan Aghadi News : संभाजीनगरात अखेर वंचितकडून 'एमआयएम'ला बाय!

महादेव जानकर(Mahadev Jankar) यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणीत येऊन सभा घेतली तर संजय जाधव यांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे यांनी भर पावसात सभा घेत महादेव जानकर यांना गाडा, असे आवाहन केले. एकूणच परभणीच्या प्रचारात शेवटच्या टप्प्यात दोन्ही बाजूंनी रंग भरला गेला. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी परभणीची लढत महादेव जानकर यांच्या चौफेर प्रचारामुळे रंगतदार आणि चुरशीच्या वळणावर पोहोचल्याचे चित्र आहे.

परभणी मतदारसंघातील ओबीसी आणि धनगर मतदारांची लक्षणीय संख्या ही जानकरांची ताकद समजली जाते, तर मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आणि आताचे उमेदवार संजय जाधव यांना मराठा समाजाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही बाजूंनी परभणी मतदारसंघाच्या विकासाचा दावा करण्यात आला आहे.

Mahadev Jankar, sanjay jadhav
Lok Sabha Election 2024 : उन्हाने तापलात, आता मनाने तापा अन् भुमरेंना माझ्यासोबत संसदेत पाठवा...

जानकरांनी परभणीच्या विकासासाठी दिल्लीतून निधी आणण्याचा दावा केला आहे, तर संजय जाधव यांनी स्थानिक उमेदवाराचा मुद्दा उपस्थित करत जानकर साताऱ्यातून परभणीकरांचे प्रश्न सोडवायला येणार आहेत का? असा तिखट सवाल करत जानकरांवर हल्ला चढवला होता.

शिवसेना पक्षफुटीनंतर पहिल्या लोकसभा निवडणुकीत परभणीकर कोणाच्या बाजूने कौल देतात? याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला असणार आहे. शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष म्हणून मान्यता मिळवून देणाऱ्या परभणीत शिवसेनेची मशाल पेटणार की, मग महायुतीच्या जानकरांची शिट्टी वाजणार? याचा फैसला उद्या मतपेटीत बंद होणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com