Bjp Name Change News Sarkarnama
मराठवाडा

Bjp On Name Change News : `छत्रपती संभाजीगर` च्या समर्थनात ठाकरे गटाचा एक अर्ज दाखवा, लाखाचे बक्षिस मिळवा..

Shivsena : स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या नेत्यांचे ढोंग या निमित्ताने उघडे पडले आहे.

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ काल शेवटच्या दिवशी सकल हिंदू एकत्रिकरण समिती आणि (Bjp)भाजपच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयात चार लाखाहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले. परंतु गेली ३५ वर्ष ज्या संभाजीनगरच्या नावावर ठाकरे गटाने राजकारण केले, मते मिळवली त्या गटाने नामांतराच्या समर्थनात एकही अर्ज दाखल केला नाही. यावरून भाजपने ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनात ठाकरे (Marathwada) गटाचा एक अर्ज दाखवा आणि १ लाख रुपये बक्षिस मिळवा, असे जाहीर आव्हान भाजपच्या वतीने देण्यात आले आहे. (Aurangabad) महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाले आणि शिंदे- फडणवीस सरकारने हिंदू जनतेच्या भावनांचा आदर करत शहारचे नाव छत्रपती संभाजीगनर व उस्मानाबादचे धाराशीव असे केले. हे करत असताना शासकीय-प्रशासकीय पातळीवर सरकारी यंत्रणेने हरकती व सूचना मागवण्यासाठी अधिसूचना देखील काढली होती.

२७ मार्च २०२३ च्या सायंकाळपर्यंत हरकती व सूचना छत्रपती संभाजीनगरच्या नावासाठी मागवण्यात आल्या होत्या. भाजपसह सगळ्या हिंदुत्ववादी संघटना, पक्ष, सामाजिक संघटनांनी लाखोंनी समर्थनात अर्ज दाखल केले. परंतु उद्धव ठाकरे गटाकडून एकही अर्ज समर्थनात दाखल करण्यात आला नाही.

स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या नेत्यांचे ढोंग या निमित्ताने उघडे पडले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनी केली. त्यांचे हिंदुत्व हे केवळ ढोंगी व संधी साधू आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जनतेने हे ओळखले असून ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनात एक जरी अर्ज दाखल केला असेल तर त्याचा फोटो दाखवा आणि एक लाख रुपयांचे बक्षिस जिंका, असे आव्हान केणेकर यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT