MLA Shrijaya Chavan Oath News Sarkarnama
मराठवाडा

MLA Shrijaya Chavan Oath News : आधी आजोबा, वडील, आई अन् आता मुलीने घेतली आमदार पदाची शपथ!

Sreejaya Chavan got her assembly membership badge from her mother's hand : विधानसभा सदस्यत्वाचा बॅच मिळाल्यानंतर श्रीजया यांनी अभिमानाने आई अमिता चव्हाण यांच्या हस्ते तो बॅच आपल्या ड्रेसवर लावून घेतला.

Jagdish Pansare

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर : नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या चार दशके वर्चस्व राहिलेल्या चव्हाण कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील श्रीजया चव्हाण यांनी आज आमदार पदाची शपथ घेतली. भोकर विधानसभा मतदारसंघातुन त्या निवडुण आल्या आहेत. त्यांच्या आधी दिवंगत नेते डॉ शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अमिता चव्हाण यांनी भोकर मतदारसंघाचे आमदार म्हणून शपथ घेतली होती.

भोकर विधानसभा निवडणुकीत यंदा प्रथमच भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलेले आहे. (Ashok Chavan) या मतदारसंघातुन महायुतीच्या उमेदवार श्रीजया अशोक चव्हाण पन्नास हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्या. काँग्रेसच्या तिरुपती कदम कोंढेकर यांचा पराभव करत श्रीजया चव्हाण यांनी विजय मिळवला.

नवनिर्वाचित आमदारांना सदस्यत्वाची शपथ आज विधीमंडळात देण्यात आली. पहिल्याच दिवशी श्रीजया चव्हाण यांनीही पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. (Nanded) चव्हाण कुटुंबातील त्या चौथ्या आमदार ठरल्या आहेत. महाराष्ट्रातले हे एक विरळे उदाहरण आहे. यापूर्वी दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, अमिता चव्हाण यांनी भोकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

श्रीजया चव्हाण यांनी आज विधानसभेत शपथवाचन सुरु करण्यापूर्वी आजोबा डॉ. शंकरराव चव्हाण यांचे महाराष्ट्राचे भगिरथ म्हणून आवर्जून स्मरण केले. विधानसभा सदस्यत्वाचा बॅच मिळाल्यानंतर श्रीजया यांनी अभिमानाने आई अमिता चव्हाण यांच्या हस्ते तो बॅच आपल्या ड्रेसवर लावून घेतला. हा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी चव्हाण कुटुंबिया आणि त्यांचे समर्थक मुंबईत दाखल झाले होते.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भोकर मतदारसंघाची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला पराभव, मतदारसंघात कधीकाळी अशोक चव्हाण यांचा शब्द खाली न पडू देणारे कार्यकर्ते विरोधात काम करू लागल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. घराणेशाहीचा आरोपही विरोधकांनी केला, पण या सगळ्यावर मात करत चव्हाण यांनी भोकरचा गड राखला. चव्हाण कुटुंबाचे या मतदारसंघावर असलेले वर्चस्व मुलाला निवडून आणत अशोक चव्हाण यांनी सिद्ध केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT