BJP Politics : भाजपच्या 'या' नेत्याचा निकालाबाबत 'अंदाज' तंतोतंत ठरला खरा

Madhya Pradesh Kailash Vijayvargiya prediction BJP Nagpur : नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाबाबत भाजपच्या एका बड्या नेत्याने वर्तविलेली भविष्यवाणी 99 टक्के खरी ठरली आहे.
BJP symbol
BJP symbolSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्वांचेच अंदाज फोल ठरले. विविध वाहिन्या आणि कंपन्यांचे प्री-पोल आणि एक्झिट पोल हास्यास्पद ठरले आहेत. आता त्यांच्या विश्वासहर्तेवरही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

मात्र नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाबाबत भाजपच्या एका बड्या नेत्याने वर्तविलेली भविष्यवाणी 99 टक्के खरी ठरली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर भाजपने (BJP) चिंतन, आत्मपरीक्षण केले. कुठे चकुले, काय चुकले याची शहनिशा केली. कुठे कमी पडलो आणि विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काय करायला पाहिजे याचे नियोजन केले. महायुती सत्तेवर असल्याने काही लोकप्रिय घोषणा केल्या. 'लाडकी बहीण', ही योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरली. त्यामुळे निकाल बदलले, असा दावा केला जात आहे.

BJP symbol
Nagpur Winter Session 2024 : महायुतीच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाच मुहूर्त ठरला

मात्र विरोधकांना तो मान्य नाही. 'ईव्हीएम'मध्येच (EVM) गडबड करून भाजप महायुतीने विधानसभेची निवडणूक जिंकल्याचा आरोप आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे एक बडे नेते, मध्य प्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय तब्बल दोन महिने नागपूरमध्ये ठाण मांडूण बसले होते. त्यांना नागपूर जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणूण भाजपने नियुक्त केले होते.

BJP symbol
Nana Patole : निमंत्रण दिले असते, तर शपथविधीला गेलो असतो; नाना पटोलेंची गुगली

निवडणकीपूर्वी आणि मतनादाच्या दिवशीपर्यंत त्यांनी शेकडो बैठका घेतल्या. हजारो लोकांसोबत संपर्क साधला. प्रत्येक विधानसभेतील राजकीय समीकरणे समजून घेतली. भाजपच्या विरोधात कोण आहे, का विरोधात आहे या माहिती घेतली. भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला दोन टक्के मते कमी पडली होती. ती भरून काढण्यासोबतच त्यात अधिक वाढ करण्यासाठी नियोजन केले. वेगवेगळ्या समाज घटाकांशी चर्चा. त्यानंतर कैलास विजयवर्गीय यांनी नागपूर जिल्ह्यात किती जागा भाजप जिंकणार याचा निष्कर्ष काढला होता. त्यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील 12 पैकी 10 जागा निवडून येणार असल्याचे 'ऑफ द रेकॉर्ड', सांगितले होते.

त्यावेळी यावर कोणाचा विश्वास बसला नव्हता. भाजपच्या नेत्यांनाही खात्री वाटत नव्हती. फिफ्टी-फिफ्टी असेच सर्वांचे म्हणणे होते. मात्र निकालानंतर कैलास विजयवर्गीय यांचाच अंदाज आणि दावा खरा ठरला आहे. भाजप महायुतीने 12 पैकी 10 जागा नागपूर जिल्ह्यातील जिंकल्या आहेत. उत्तर नागपूर आणि उमरेड विधानसभा मतदारसंघ जिंकणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांचा अंदाज फक्त पश्चिम नागपूरमध्ये चुकीचा निघाला. येथून भाजपचे सुधाकर कोहळे यांचा काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी पराभव केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com