Suresh Bankar Sarkarnama
मराठवाडा

Sillod Assembly Election : सिल्लोडमधील गुंडागर्दी संपवण्यासाठी बनकर आमदार झाले पाहिजे : उद्धव ठाकरे

Sillod Assembly Election : विरोधी उमेदवाराकडे धनशक्ती आहे, पण माझ्याकडे माझ्या जीवाभावाची जनशक्ती आहे

सरकारनामा ब्यूरो

Sillod Assembly Election : या सिल्लोडमध्ये म्हणे त्या गद्दाराची खूप गुंडागर्दी आहे. ही गुंडागर्दी संपवण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यासाठीच मला सुरेश बनकर आमदार पाहिजे आहेत, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिल्लोडच्या मतदारांना आवाहन केले.

या गद्दाराने आणि त्याच्या टोळक्याने ज्यांच्या जमीनी हडपल्या आहेत, त्या सगळ्यांची चौकशी करुन त्या जमीनी ज्यांच्या आहेत, त्यांना परत करण्याचे वचन उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दिले.

उद्धव ठाकरे यांची आज सिल्लोड - सोयगांव विधानसभा मतदार संघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ जाहिर सभा झाली. यावेळी उद्धट, गुंडगिरी आणि शिवीगाळ करत शिवराळ भाषा करणाऱ्याला गाडण्यासाठी सुरेश बनकर यांना निवडून आणण्यासाठी मशाल पेटवण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.

विरोधी उमेदवाराकडे धनशक्ती आहे, पण माझ्याकडे माझ्या जीवाभावाची जनशक्ती आहे. या जोरावर आपण या गद्दाराला निश्चित गाडणार म्हणजे गाडणारच.

आम्ही जी वचन महाराष्ट्रातील जनतेला वचननाम्यातून देत आहोत, ती पुर्ण करण्यासाठी आणि सिल्लोडमधील गुंडागर्दी संपवण्यासाठी मला सुरेश बनकर आमदार पाहिजेत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केले.

सुप्रिया सुळे यांना कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ करणाऱ्या सिल्लोडमधील गद्दाराच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येतात, तेव्हा त्यांना हे हिंदुत्व ही संस्कृती मान्य आहे का? असा सवाल ठाकरे यांनी केला.

सिल्लोडमधील व्यापारी, सर्वसामान्य जनता गद्दाराच्या त्रासाला कंटाळली आहे. अनेकांच्या जमीनी बळकावल्याची माहिती माझ्याकडे आली आहे. या जमीनी बळकावणाऱ्यांची चौकशी करून त्या खऱ्या मालकाला परत करण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी या सभेत दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT