Majalgaon Assembly Election : आमदार सामान्यांना भेटत नाहीत, भेटले तर निट बोलत नाहीत. अनेक गावांत ते पाच वर्षांत गेलेही नाहीत. आपण एकेका गावात तीन - चार वेळा पोचलो.
सर्वच उमेदवारांच्या तुलनेत आपली स्पीडच येवढीय की भविष्यात आमदार झाल्यानंतर लोकांना आपल्याकडे यावे लागणार नाही तर आपणच लोकांच्या दारी जाणार आणि त्यांच्या समस्या सोडविणार, अशी आपली संकल्पना असल्याचे माजलगाव मतदार संघातील अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर म्हणाले.
आपण अपक्ष रिंगणात असलो तरी मतदार संघाचे भवितव्य आणि आपल्या चांगुलपणामुळे सर्वच पक्षांचे नेते आणि आणि सर्वच घटकांतील मतदारांचा आपल्यालाच पाठींबा मिळत असल्याचे दावा आडसकर यांनी केला.
मतदार संघातील जनता यंदा आपले चिन्ह शेगडीच पेटविणार आणि पुन्हा एकदा अपक्ष विजयाच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी रमेशराव आडसकर यांना पाठींबा दिला.
यावेळी आडसकर बोलत होते. मागच्या १० वर्षांपासून मतदार संघात काम करत आहे. मागच्या निवडणुकीतील पराभवाच्या तिसऱ्या दिवशीपासून आपण लोकांच्या दारात, सुख - दु:खात आणि शेतात आहोत.
त्याची जाण सामान्य मतदारांमध्ये असल्याने मला या निवडणुकीत खरा उत्साह आला आहे. ठराविक ठेकेदार, गुत्तेदार सांभाळणे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, व्यापाऱ्यांना मारहाण करणे असले लोकप्रतिनिधी नसतात.
लोकांमध्ये मिसळणारा, त्यांचे सुख - दु:ख जाणून घेणारा व्यक्ती लोकांना आवडतो. आपल्या पदाची घमेंड घेत घरात बसून कारभार हाकणाऱ्यांना जनता कंटाळली आहे, अशी टीकाही आडसकर यांनी विरोधकांवर केली. व्यक्तीचे वागणे, बोलणे, चारित्रय या बाबीही सर्वांच्या समोर आहेत. आडसकरांच्या इतिहासात कधीही कोणाला दुय्यम लेखले नाही.
सर्वच जाती, धर्मांना सोबत घेऊन चालण्याचे दिवंगत लोकनेते बाबुराव आडसकर यांचे राजकारण पुढे चालविताना कधीही कोणाला दुखावले नाही. त्यामुळेच आपल्याला सर्वच घटकांचा पाठींबा मिळत आहे.
विशेष म्हणजे विविध पक्षांचे उमेदवार रिंगणात असतानाही आपल्याला त्या सर्व पक्षांच्या नेत्यांचा पाठींबा मिळण्याचे कारण म्हणजे सर्वांना आता बदल दिसतोय, असेही आडसकर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.