Kirit Somaiya In Sillod News Sarkarnama
मराठवाडा

Kirit Somaiya News सिल्लोडमध्ये माझ्यावर, गाडीवर हल्ला ; किरीट सोमय्या यांच्या दाव्याने खळबळ

BJP’s former MP Kirit Somaiya claims he was attacked along with his car in Sillod. : किरीट सोमय्या यांचा पाचवा सिल्लोड दौरा आहे. बोगस जन्म प्रमाणपत्रांचे वाटप नगर परिषदेच्या वतीने करण्यात आल्याचा आरोप आणि त्या संदर्भातील पुरावे त्यांनी पोलीस व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.

Jagdish Pansare

BJP News : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर सिल्लोडमध्ये हल्ला झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. बोगस जन्म प्रमाणपत्रांच्या विरोधातील पुरावे सादर करण्यासाठी सोमय्या आज सिल्लोडमध्ये आले होते. पोलीस स्टेशनजवळच त्यांच्यावर आणि गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याचा दावा त्यांनी स्वत: 'एक्स' वरील पोस्टमधून केला आहे. मात्र सोमय्या हे पोलीस स्टेशनमधून एसडीएम कार्यालयाकडे जात असताना चार ते पाच मुस्लिम लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून घोषणा दिल्या. त्यानंतर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेल्याची माहिती आहे.

किरीट सोमय्या (Kirit Soamyia) यांचा आजचा हा पाचवा सिल्लोड दौरा आहे. बोगस जन्म प्रमाणपत्रांचे वाटप नगर परिषदेच्या वतीने करण्यात आल्याचा आरोप आणि त्या संदर्भातील पुरावे देण्यासाठी ते वारंवार सिल्लोडमध्ये येत आहेत. यापूर्वीही त्यांनी उपविभागीय अधिकारी, तसेच सिल्लोडमधील पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे बोगस प्रमाणपत्रांचे वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. एसडीएम यांना निलंबित करा, अशा मागणीचे पत्रही सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते.

आधी बनावट आधार कार्डाचा पुरावा ग्राह्य धरून ज्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना बोगस जन्म प्रमाणपत्र दिले त्यांच्यावर कारवाई करा, त्यानंतर बोगस जन्म प्रमाणपत्र मिळवणारे कोण आहेत? (BJP) बांगलादेशी, पाकिस्तानी, इराणी की रोहिंगे? याचा तपास एटीएस करेल, असे सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, सिल्लोडमध्ये आपल्यावर आणि गाडीवर मुस्लिमांकडून हल्ला झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला.

सिल्लोड येथे माझ्यावर/माझ्या गाडीवर हल्ला झाला. आत्ताच सिल्लोड (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुस्लिम अतिरेक्यांनी माझ्यावर आणि माझ्या गाडीवर हल्ला केला. सीआयएसएफ (कमांडो) सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना हाकलून लावले. मी सिल्लोड पोलिस आणि एसडीओ तहसीलदार यांच्याकडे अकराशे बोगस जन्म प्रमाणपत्रांच्या फसवणुकीचे पुरावे सादर केले.

महाराष्ट्रात जन्म प्रमाणपत्रे मिळवणाऱ्या आणि मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2.24 लाख अपात्र, घुसखोर, बेकायदेशीर व्यक्तींविरुद्ध माझा लढा सुरूच राहील, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सोमय्या यांच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली. परंतु सोमय्या यांच्यावर कुठल्याही प्रकारचा हल्ला झाला नाही, तर त्यांना काही मुस्लिमांनी काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचे बोलले जाते. पोलीसांनी या तरुणांना ताब्यात घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT