Kirit Somaiya Politics: किरीट सोमय्यांचा फुसका बार...मालेगावला डोंगर पोखरून उंदीरही निघाला नाही...

Kirit Somaiya; BJP's Somaiya made allegations against Bangladeshi citizens in Malegaon city-भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव शहराचे अनेक दौरे करून बांगलादेशी नागरिकांबाबत शहरावर गंभीर आरोप केले होते.
Kirit Somaiya
Kirit Somaiya Sarkarnama
Published on
Updated on

Kirit Sommaiya News: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली काही दिवस बांगलादेशी नागरिक हा राजकीय अजेंडा राबविला होता. त्यासाठी मालेगाव सह अनेक शहरांचे प्रशासन वेठीस धरले होते. प्रत्यक्षात मात्र आता किरीट सोमय्या यांचा हा राजकीय बार फुसका ठरला आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी नागरिक मालेगाव शहरात राहतात असा आरोप वारंवार केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी घोषित केली होती. सलग आठ महिने एसआयटी पथकाने मालेगाव शहरातील गल्लोगल्ली जाऊन तपासणी केली. तपासणीचा अहवाल नुकताच प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपाला एमआयएमच्या आमदार मुलांना मुफ्ती इस्माईल, माजी आमदार रशीद शेख आणि काँग्रेसच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यांनीही टीका केली होती. भाजपच्या राजकीय हेतूसाठी मालेगाव शहराला बदनाम केले जात असल्याचा आरोप या नेत्यांनी सोमय्या यांच्याविरोधात केला होता.

Kirit Somaiya
EVM Hacking Politics: Shocking....शरद पवारांच्या आरोपांना पृष्ठी....नाशिक विधानसभा निवडणुकीतही एकाने दिली होती हॅकींगची ऑफर!

माजी खासदार सोमय्या यांनी गेल्या दहा महिन्यात अनेक दौरे मालेगाव शहरात केले. यावेळी महसूल, महापालिका आणि पोलिसांचे सबंध प्रशासन त्यांच्या सेवेला हजर होते. या प्रकरणात वारंवार धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाला. याबाबत दोन्ही बाजूच्या नेत्यांनी सोमय्या यांचे समर्थन आणि विरोध केला. मात्र सात महिन्यांच्या तपासानंतर एसआयटी पथकाने आपला अहवाल सादर केला आहे.

पोलिसांच्या एसआयटी पथकाच्या अहवालात एकही बांगलादेशी नागरिक मालेगाव शहरात आढळलेल्या नाही. त्यामुळे माजी खासदार सोमय्या यांचा बांगलादेशी अजेंडा म्हणजे खोदा पहाड आणि निकला चुहा देखील नाही अशी स्थिती झाली आहे. या कालावधीत मालेगाव शहरातील नागरिकांना मात्र अनावश्यक मनस्ताप सहन करावा लागला आहे. अनेकांना विनाकारण तुरुंगाची हवा खावी लागली. तहसीलदारांसह महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या नोकरीवर ही गंडांतर आले आहे.

या प्रकरणात महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ जयश्री आहेर आणि तहसीलदार विशाल सोनवणे यांनी शहरातील किल्ला आणि छावणी पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये जवळपास दीडशे नागरिकांना पुरेसे कागदपत्र नसताना प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज केल्याने आरोपी करण्यात आले. सात महिने पोलिसांनी विविध यंत्रणांनी तपास केला.

विशेष तपास पथकाने साठ पानांचा आपला अहवाल सादर केला आहे. यामध्ये तीन हजाराहून अधिक प्रमाणपत्रांची तपासणी झाली आहे. ३७ संशयित प्रमाणपत्रे व अर्ज करणारे आढळले नाही. मात्र मालेगाव शहरात एकही बांगलादेशी नागरिक नसल्याचा खुलासा आता खुद्द पोलिसांच्या एसआयटी पथकांनीच केला आहे. त्यामुळे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा बांगलादेशी नागरिकांबाबतची मोहीम टाय टाय फिस्स ठरली आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com