CM Eknath Shinde  Sarkarnama
मराठवाडा

CM Eknath Shinde and Pathan Family : '...म्हणून 'लाडकी बहीण योजने'च्या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांनी येऊ नये' ; सिल्लोडच्या पठाण कुटुंबीयांचं आवाहन!

Mayur Ratnaparkhe

Sillod Political News : सिल्लोडमध्ये उद्या (शुक्रवार) लाडकी बहीण योजनेची सुरुवात जिथून होत आहे, त्या जागेवरून आता सिल्लोडमधल्या पठाण कुटुंबीयांनी आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमाला येऊ नये असं आवाहन केलं आहे.

मंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी खोट्या कागदपत्र आधारे जमीन बळकावली असून या जागेवर केलेले सर्व बांधकाम नियमबाह्य बेकायदेशीर असल्याचा आरोप पठाण कुटुंबीयांनी केलाय. मात्र यावर सत्तार यांनी चांगल्या कार्यक्रमावेळी या वेळी विषयावर बोलणार नसल्याचे सांगितले.

प्रकरण काय आहे? -

पठाण परिवाराचा आरोप आहे की, मंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यक्रम ज्या ठिकाणी घेत आहेत ती जमीन पठाण कुटुंबीयांची वडिलोपार्जित आहे. सर्वे नंबर 377 जमिनीचा वाद सध्या न्यायालयात असताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी बळजबरीने जागेवर ताबा मिळवला आहे. त्याठिकाणीं बेकायदेशीर व नियमबाह्य बांधकाम केले आहे.

या जमिनीवर सन 2021 साली वादविवाद झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने पठाण परिवारास समजपत्र दिले होते. सदर जागेवर भांडण तंटे न करता न्यायालयातून आदेश प्राप्त करण्याबाबत पोलिसांनी सूचना केली होती.

तसेच, पठाण परिवार यांच्या सांगण्यानुसार त्यांनी सिल्लोड दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. महसूल विभागाकडे सुद्धा अर्ज दाखल केलेले आहेत. मात्र मंत्री अब्दुल सत्तार सातत्याने अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळण्यास विलंब होत आहे, असा आरोप पठाण परिवाराने केला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस प्रशासन, नगर विकास विभाग, महसूल विभाग यांच्याकडे ई-मेलद्वारे पठाण परिवाराने निवेदन देऊन आपला आक्षेप दाखल केला आहे

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT