Marathwada : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर काॅंग्रेसचेही घर फुटणार असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलतांना केला होता. (Sanjay Shirsat-Ashok Chavan News) यावर काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अगदी थोडक्यात प्रतिक्रिया देत हा दावा खोडून काढला. संजय शिरसाट केव्हापासून भविष्यकार झाले, मला माहित नाही.
पण अशा प्रकारची चुकीची वक्तव्य करून संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. यापलीकडे याला काही अर्थ नाही, अशा शब्दात चव्हाण (Ashok Chavan) यांनी काॅंग्रेस फुटीच्या चर्चा या निरर्थक असल्याचे म्हटले आहे. राज्यात आधी शिवसेना (Shivsena) फुटली, त्यानंतर आता राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाला आहे. आणखी एक पक्ष लवकरच फुटणार आहे, तो म्हणजे काॅंग्रेस. काॅंग्रेसचे घर फुटणार आहे, हे मी वारंवार सांगतोय.
आता त्यांच्याकडचं कोण कोण येतंय? याकडे आमचे लक्ष असल्याचा दावा (Sanjay Shirsat) संजय शिरसाट यांनी केला काही तासांपुर्वी केला होता. काॅंग्रेसचे काही आमदार, नेते सरकारमध्ये आले तरी आम्हाला काही अडचण नाही, नाराजी नाही, असेही ते म्हणाले होते. या संदर्भात अशोक चव्हाण यांना विचारले असता, त्यांनी मात्र शिरसाट यांचे विधान म्हणजे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केले असून यापेक्षा त्याला जास्त महत्व देण्याचे कारण नाही.
शिरसाट कधीपासून भविष्यकार झाले मला माहित नाही, असा टोला देखील चव्हाण यांनी लगावला. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, काॅंग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळणार का? तुमचे नावाच्या चर्चा आहे? यावर देखील चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले. सर्वात जास्त सदस्य संख्या असलेल्या पक्षाचा विरोधी पक्षनेते असतो, परंतु अद्याप यावर आज चर्चा झालेली नाही. कुणाला विरोधी पक्षनेता करायच याचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते व काॅंग्रेसचे वरिष्ठ ठरवतील, असेही चव्हाण यांनी सांगितले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.