SIT Inquiry : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यसह देशात खळबळ उडवून दिली आहे. याप्रकरणामुळे राज्यातील महायुती सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळे सरकारने विशेष चौकशी पथक (SIT) गठीत केलं असून फक्त १२ तासातच हे पथक अॅक्शन मोडवर आले आहे. आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्त्वातील पथक आज बीड जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सध्या सीआयडी तपास करत आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हिवाळी अधिवेशना दरम्यान विशेष चौकशी पथकाची (SIT) घोषणा केली होती. यानंतर बुधवारी (ता.१) एसआयटी स्थापनेबाबत गृह विभागाकडून अधिकृत आदेश काढण्यात आले. हे पथक आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्त्वातील असून यात १० अधिकारी आहेत.
आज एसआयटी बीड (Beed) जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता असून पथकाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे सीबीआय पाठोपाठ आता एसआयटीच्या तपासानंतर या प्रकरणाला अधिक गती येईल.
देशमुख हत्या प्रकरणाला २३ दिवस होत असून अद्याप मारेकरी फरार आहेत. तर या प्रकरणातील मास्टरमाईंड असणारा वाल्मिक कराड सीबीआयच्या शरण आला असून सध्या तो १४ दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे. त्याच्याकडे सीबीआयचे अधिकारी चौकशी करत आहेत. तर सुदर्शन घुले सह इतर दोघांच्या शोधात पथके रवाना झाली आहेत. घुलेसह इतर दोघांच्या घरचे आणि नातेवाईक यांच्याकडे सीबीआय चौकशी करत आहे. यासाठी केज येथील घुलेच्या गवात पथक पोहचले होते.
संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सीबीआय घेत आहे. यात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांचा समावेश असून यांच्याशी त्यांच्या कुटुंबियांचा संपर्क असल्याचा संशय सीबीआयचा आहे. त्यावरून सीबीआयने सुदर्शन घुलेच्या कुटुंबियांची चौकशी केली आहे. मात्र यातून कोणतेच धोगेदोरे हाती लागलेले नाहीत.
आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली - पोलीस उपमहानिरीक्षक
अनिल गुजर - पो. उप अधीक्षक
विजयसिंग शिवलाल जोनवाल- स.पो. निरीक्षक
महेश विघ्ने - पो.उ.निरीक्षक
आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक
तुळशीराम जगताप - सहा. पो. उ. निरीक्षक
मनोज राजेंद्र वाघ - पोलीस हवालदार
चंद्रकांत एस.काळकुटे - पोलीस नाईक
बाळासाहेब देविदास अहंकारे - पोलीस नाईक
संतोष भगवानराव गित्ते - पोलीस शिपाई
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.