
Beed News : केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यांनतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेला २३ दिवस पूर्ण झाले असले तरी फरार आरोपीना ताब्यात घेतलेले नाही. या घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिकी कराड मंगळवारी पुण्यात शरण आल्यानंतर त्याची रवानगी 15 दिवसाच्या कोठडीत करण्यात आली. त्यातच आता एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याने याप्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे.
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) जवळच्या नेते असलेल्या दीपक केसरकर यांनी बुधवारी नववर्षाच्या निमित्ताने शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर प्रसार माध्यमांना बोलताना प्रतिक्रिया दिली. यावेळी बीड सरपंच हत्या प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर केसरकर म्हणाले, 'वाल्मिक कराडला शंभर टक्के अटक होईल आणि शिक्षा होईल हे मी अगोदरच बोललो आहे. त्याचा कुणाशी संबध आहे हे सिद्ध झालेले नाही. जेव्हा काही सिद्ध होईल तेव्हा त्यावर बोलता येईल. आज बोलले तर कुणाचीतरी बदनामी केल्यासारखे होईल.'
या प्रकरणाची बीड पोलीसांना निष्पक्ष चौकशी करण्याची संधी द्यायला हवी. तपासाला एवढी पथके लागली होती की सरेंडर झाले नसते तरीही अटक झाली असती. परिवार आणी संबंधितांची खाती सील केली गेली. त्यामुळे दुसरा पर्यायच नव्हता. गुन्हेगार म्हणत असतो मी सरेंडर झालो मात्र असे काही नव्हते,' असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणातील काही आरोपीना अटक झाली आहे. इतर आरोपींनाही लवकरच अटक होईल. कुठल्याही गोष्टीला तपास करायला पोलिसांना संधी दिली पाहिजे. अशा प्रवृत्तीचा तरच नाश होईल. एका प्रकरणातून अनेक प्रकरणे बाहेर निघाली आहेत. राखेच्या व्यवसायातून गुन्हेगारी फोफावत असेल तर त्यास आळा घालण्याचे काम सरकार करेल, असेही केसरकर यांनी सांगितले.
साईबाबांच्या दर्शनाने एक नवी ऊर्जा प्राप्त होते. मंत्री न बनल्यामुळे मला कोकणवासीयांची सेवा करण्याची संधी मिळेल. बाबांच्या आशीर्वादाने काम लवकर घडते. बाबांकडून आशीर्वाद मागितल्यावर जनतेला सुख समृद्धी लाभेल हा विश्वास आहे. शेतकरी सुखी झाला तर महाराष्ट्र सुखी होतो. नवीन सरकार आले आहे. त्यांना साईबाबा शक्ती देवो ही प्रार्थना, असेही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.
यावेळी त्यांना त्यांच्या नाराजीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. किती दिवस तुम्ही नाराजी नाराजी करत बसणार? आता मंत्र्यांना चांगल्या कामासाठी सदिच्छा दिल्या पाहिजे. त्यांच्या आनंदात आपण सहभागी झाले पाहीजे. नाराजीने राज्य चालत नाही. मेहनतीने राज्य चालते, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.