Rajendra Ghnwat-Anjali Damania-Dhnanjay Munde News Sarkarnama
मराठवाडा

SIT Enquiry News : धनंजय मुंडेंचा आणखी एक सहकारी एसआयटीच्या फेऱ्यात! राजेंद्र घनवटच्या जमीन खरेदीची होणार चौकशी

Rajendra Ghanwat, a close associate of Dhananjay Munde, faces an SIT investigation over alleged irregularities in farmland purchases. : महसूल मंत्री बावनकुळे यांनी पूर्ण वेळ देऊन, अतिशय गंभीरतेने सगळे ऐकून घेतले असे सांगत केलेल्या सहकार्या बद्दल त्यांचे आभार दमानिया यांनी मानले आहेत.

Jagdish Pansare

Maharashtra Political News : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा आणखी एक सहकारी एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाननिया यांनी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राज घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने खरेदी केल्याचा आरोप केला होता. संबंधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन दमानिया यांनी 8 एप्रिल रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली होती. त्यानूसार एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यानंतर अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राजेंद्र घनवट यांनी बेकायदेशीर व अवैध मार्गाने महाराष्ट्रामध्ये खरेदी केलेल्या जमिनींची चौकशी करण्यासाठी विशेष पथक (SIT) नेमण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या कुटुंबाने व त्यांच्या कंपनी मार्फत महाराष्ट्रातल्या सगळ्या जमिनींची सखोल चौकशी होणार असल्यामुळे दमानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत. राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत, ह्याच राज घनवट ने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत, व याच जमिनीच्या चौकशीची मागणी, मी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली होती, अशी प्रतिक्रिया दमानिया यांनी 'एक्स'वर दिली.

खेड मधल्या पाईट गावात मोठ्या प्रमाणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अतिशय जवळचे राजेंद्र घनवट आणि त्यांचे वडील पोपटलाल घनवट यांनी शेतकऱ्यांची लूट केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला होता. त्यानंतर महसूल मंत्र्यांनी सगळ्या संबंधित अधिकार्‍यांची तत्काळ बैठक बोलावली होती. सखोल चौकशीचे आदेश देऊन, पुन्हा 8 तारखेला दुपारी तीन वाजता या सगळ्या चौकशीची माहिती त्यांच्याकडून मागवण्यात आली आहे. राजेंद्र घनवट आणि पोपटलाल घनवट यांच्या पाईट गावात असलेल्या घराची व जमिनींची पूर्ण माहिती मागवण्यात आली आहे.

महसूल मंत्री बावनकुळे यांनी पूर्ण वेळ देऊन, अतिशय गंभीरतेने सगळे ऐकून घेतले आणि केलेल्या सहकार्या बद्दल त्यांचे आभार दमानिया यांनी मानले आहेत. महाराष्ट्राची बिघडलेली घडी पुन्हा सरळ करण्यासाठी सगळ्या मंत्र्यांनी असेच सहकार्य करावे, अशी विनंतीही दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे. घनवट यांच्या नावे महाराष्ट्रात असलेल्या जमिनींच्या चौकशीसाठी महसूल व वन विभागाने निर्णय घेत जीआर प्रसिद्ध केला आहे. या एसआयटीमध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त एसआयटीचे प्रमुख, सोबतच नोंदणी महानिरीक्षक, जमावबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख, पुण्याचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

घनवट ॲग्रो लिमिटेडच्या नावाने राज्यात किती ठिकाणी खरेदी व्यवहार झाले आहेत. घनवट यांच्याशी संलग्न संस्था, कंपन्या यांच्यासाठी अकृषिक कारणांसाठी वर्ग केलेल्या जमिनी, बाजारभावापेक्षा कमी मोबदला रक्कम देऊन खरेदी झालेल्या जमिनींची चौकशी, अनुसूचित जमाती खातेदारांच्या जमिनी, महार वतन तसेच नवीन शर्तींच्या जमीनींच्या खरेदी व्यवहारांमध्ये किती प्रकरणात विनापरवानगी खरेदी व्यवहार झालेले आहेत यासंदर्भात चौकशी होणार आहे.

सोबतच, घनवट ॲग्रो फुड्स तर्फे संचालक पोपट घनवट यांच्या नावे झालेल्या खरेदी व्यवहारांची तपासणी देखील एसआयटी करणार आहे. पुण्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा राजेंद्र घनवट यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी काही शेतकरी अंजली दमानिया यांच्याकडे तक्रार घेऊन आल्यानंतर त्यांच्याकडून याबाबत माहिती देण्यात आली होती. दरम्यान, राजेंद्र घनवट हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे पार्टनर असून आर्थिक देवाणघेवाण यात झाल्याचा दमानियांचा आरोप होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT