Anjali Damania News : अंजली दमानिया पुन्हा मैदानात; आता निशाण्यावर तटकरेंसोबत फडणवीसही...काय आहे प्रकरण..?

Anjali Damania On Sunil Tatkare : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी (ता.18) ट्विट करत पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधात दंड थोपटले असतानाच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरही टीकेची झोड उठवली आहे.
anjali damania
anjali damaniaSarkarnama
Published on
Updated on

Anjali Damania News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारीचं भीषण वास्तव समोर आणण्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा मोठा वाटा आहे. तसेच त्यांनी देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह माजी मंत्री व परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्याविरोधात जोरदार हल्ला चढवला होता. आता त्याच अंजली दमानिया (Anjali Damania) पुन्हा एकदा मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच निशाणा साधला होता.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी (ता.18) ट्विट करत पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याविरोधात दंड थोपटले असतानाच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरही टीकेची झोड उठवली आहे.

दमानिया ट्विटमध्ये म्हणतात, जनतेच्या कष्टाने कमावलेल्या कराच्या पैशातून तटकरेंसाठी खास हेलिपॅड? ती पण चार चार हेलिपॅड? अमित शाह यांची भेट वैयक्तिक होती.तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

anjali damania
Dhananjay Munde Health Update : धनंजय मुंडेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; बेल्स पाल्सी,डोळ्यांच्या ऑपरेशननंतर आता...

अंजली दमानिया ट्विटमध्ये काय म्हणाल्या?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुनील तटकरेंवर घणाघाती टीका केली.त्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘जनतेच्या कष्टाने कमवलेल्या कराच्या पैशातून तटकरेंसाठी खास HELIPAD? ती पण चार चार Helipad? अमित शाह भेट वैयक्तिक होती.तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी?अमित शाह यांना जेवायला घालायचंय, खुशाल घाला. सोन्याच्या ताटात घालायचंय, तरी घाला. ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी? असा सवालही त्यांनी तटकरेंना केला आहे.

पुढे त्या म्हणतात,तटकरेंच्या अफाट कंपन्या आहेत ना ? मग त्यांनी वैयक्तिक खर्च करावा. देवेंद्र फडणवीसांचे पुनःश्च अभिनंदन. सिंचन घोटाळा विसरून नवीन सरकार मधे खूपच चांगला ताळमेळ जाणवत असल्याचा खोचक टोलाही दमानिया यांनी पोस्टमध्ये लगावला आहे.

anjali damania
Bachchu Kadu On Raj Thackeray : राज ठाकरे ठरवणारे कोण? बच्चू कडू कडाडले, 'आमदार, खासदार अन् अधिकाऱ्यांची पोरं दहा-दहा भाषा...'

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी शाह यांच्यासाठी शाही स्नेहभोजनांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार हेही उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com