Nanded Political News Sarkarnama
मराठवाडा

Slogan against Girish Mahajan : मराठा आरक्षणाची मागणी करत गिरीश महाजनांच्या विरोधात घोषणाबाजी...

Marathwada Political News : पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत मंत्र्यांच्या ताफ्याला मार्ग करून देत आंदोलकांना ताब्यात घेतले.

Jagdish Pansare

Nanded Political News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजवंदनासाठी आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांना मराठा समाज बांधवांच्या रोषाचा सामना करावा लागला. (Guardian Minister News) महाजन ध्वजवंदनासाठी जात असताना मराठा आरक्षणाची मागणी करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. तसेच गिरीश महाजन 'चले जाव'च्या घोषणा दिल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.

आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी धावाधाव केली. (Nanded) मराठा समाजाला तातडीने ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्याची मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांतून सकल मराठा समाजाच्या वतीने विविध प्रकारे आंदोलन करून करण्यात येत आहे. याचा फाटका पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना आज बसला. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर सतराव्या दिवशी जरांगे यांनी आंदोलन मागे घेतले. (Maratha Reservation) परंतु तरीही मराठवाड्यात ठिकठिकाणी अजूनही मराठा आरक्षणाच्या मागणीवरून समाज आक्रमक पावित्र्यात आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नांदेड शहरातील माता गुजरिजी उद्यानात हुतात्मा स्मारकाला अभिवादन व ध्वजवदन सोहळा पार पडला.

या सोहळ्याला जात असताना आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत मंत्र्यांच्या ताफ्याला मार्ग करून देत आंदोलकांना ताब्यात घेतले. सकल मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री 'चले जाव, एक मराठा लाख मराठा, राज्य सरकार मुर्दाबाद, मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण मिळालेच पाहिजे,' अशा घोषणाही या वेळी देण्यात आल्या. छावा, संभाजी ब्रिगेड, शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) आदी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT