CM Eknath Shinde Press : मुख्यमंत्र्यांचेही `नमो नमो`; मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अभियान...

Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती सुरू असून, जगभरात देशाला गौरव, सन्मान मिळत आहे.
CM Eknath Shinde Latest News
CM Eknath Shinde Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात `नमो` ११ सूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. (CM Press News) वर्षभरात ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ, ७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच देणे यासह शेततळे, आत्मनिर्भर गाव विकास व इतर योजना राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

CM Eknath Shinde Latest News
CM Eknath Shinde On Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले, मराठा समाजाला सरसकट आरक्षण नाहीच...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती सुरू असून, जगभरात देशाला गौरव, सन्मान मिळत आहे. (Eknath Shinde) देशाची महासत्तेकडे वाटचाल सुरू असून, राज्यालादेखील केंद्राकडून बळ मिळत आहे. त्यामुळे राज्य वेगाने पुढे जात आहे. म्हणून आगामी वर्षभर नमो ११ सूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

त्यात ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देऊन ४० लाख महिलांना शक्ती गटाच्या प्रवाहात आणणे, पाच लाख महिलांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ, ७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षेचे संच देणे, ७३ हजार शेततळे उभारणे, ७३ आत्मनिर्भर गावे विकसित करणे, (Maharashtra) नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान, ७३ ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम करणे, ७३ आदिवासी स्मार्ट शाळांची उभारणी व सुधारणा.

तसेच ७३ विज्ञान केंद्र उभारणे, ७३ दिव्यांग पुनर्वसन केंद्र, ७३ क्रीडा संकुल, ७३ शहर सौंदर्यीकरण प्रकल्प, ७३ ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करणे अशा उपक्रमांचा समावेश असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मराठवाड्याच्या विकासासाठी केवळ घोषणा झाल्या, असा आरोप विरोधकांकडून होत आहे, असा प्रश्‍न केला असता, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही फक्त घोषणाच करत नाही तर त्याची अंमलबजावणीदेखील करतो. तुम्ही तर घोषणाही केल्या नाहीत. जे मंत्रालयात जात नव्हते, ते घोषणा तरी काय करणार? आणि आमच्यावर काय टीका करणार? अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मी, अजित पवार त्या सरकारमध्ये होतो, पण निर्णयच होत नव्हते, असे शिंदे म्हणाले. अजित पवार म्हणाले, मंत्रिमंडळ कामांची शिफारस करते, निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा असतो, इच्छाशक्ती आणि विश्‍वास असणारा मुख्यमंत्री पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या `नमो` अभियानाला निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी दिली. त्या-त्या योजनेप्रमाणे संबंधित खात्याकडून निधी दिला जाईल. त्यासोबतच डीपीसीमधून नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जातात. त्यात या योजनांचा समावेश होईल. अर्थसंकल्पातही तरतूद केली जाईल. वर्षभरात नमो अभियानातील ७५ टक्के कामे पूर्ण होतील, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com