Central Minister Smriti Irani News
Central Minister Smriti Irani News Sarkarnama
मराठवाडा

Smriti Irani News : स्मृती इराणी एक कोटी लाभार्थी महिलांसोबत घेणार सेल्फी..

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : केंद्रीय बाल विकास मंत्री तथा भाजपच्या नेत्या स्मृती इराणी या देशभरातील एक कोटी महिलांसोबत सेल्फी घेणार आहेत. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळालेल्या महिलासोबत सेल्फी घेण्याची मोहिम (bjp) भाजपच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ स्मृती इराणी या छत्रपती संभाजीनगरातून करणार आहेत.

२७ फेब्रुवारी सोमवारी जी-20 च्या अनुषंगाने आयोजित विविध बैठकांना स्मृती इराणी (Smriti Irani) उपस्थित राहणार आहेत. (Maharashtra) त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आयोजित लाभार्थ्यांच्या मेळाव्यात देखील त्या हजेरी लावणार आहेत.

या दरम्यान इराणी महिला लाभार्थ्यांसोबत सेल्फी घेणार आहेत. देशभरातील एक कोटी महिला लाभार्थ्यांसोबत इराणी या सेल्फी घेणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड , भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि चौदा महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप (Bjp) सज्ज झाली आहे. भाजपच्या वतीने दिल्ली ते गल्ली विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानूसार केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ ज्या नागरिकांनी घेतला आहे, त्यांच्यासोबत सेल्फी आणि संवाद कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT