Imtiaz Jalil News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil News : तर `आदर्श`च्या ठेवीदारांना तीन महिन्यात पैसे मिळू शकतील..

Aimim : निबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, बँक मॅनेजर तसेच मानकापेचा मुलगा, सूनेलाही अटक करा.

सरकारनामा ब्युरो

Adarsh Scam : अंबादास मानकापे याने आपल्या वकिलामार्फत न्यायालयात एक शपथपत्र दाखल करावे. ज्यामध्ये `मी माझ्या स्वतःच्या इच्छेने माझी सर्व संपत्ती विकून या ठेवीदारांचे पैसे देत आहे, असे नमूद असावे. (Imtiaz Jalil News) तरच आदर्श पतसंस्था घोटाळ्यातील सर्व ठेवीदारांचे पैसे तीन महिन्यात मिळू शकतील, असा दावा खासदार इम्तियाज जलील यांनी केला.

यासाठी सर्व ठेवीदारांनी मानकापेवर शपथपत्र लिहून देण्यासाठी दबाव आणा, कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे, आवाहनही इम्तियाज (Imtiaz Jalil) यांनी केले. आदर्श पतसंस्थेच्या (Scams) ठेवीदार संघर्ष कृती समितीने शनिवारी बैठक आयोजित केली होती. इम्तियाज जलील यांनी ठेवीदाराशी संवाद साधला व सर्वांचे पैसे मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी ग्वाही दिली.

ठेवीदारांचे पैसे लवकर कसे मिळू शकतात हे सांगण्यासाठी त्यांनी पुण्यातील डीएसके बिल्डरचे उदाहरण दिले. (AIMIM) या विकसकाने कोट्यावधीचा घोटाळा केल्यानंतर न्यायालयात वकिलामार्फत माझी सर्व संपत्ती विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे, असे शपथ पत्र लिहून दिले होते. त्यानंतर लोकांना पैसे मिळाले होते, याचप्रमाणे जर मानकापेवर अशा प्रकारचे शपथपत्र लिहून देण्यासाठी तपास यंत्रणांनी आणि ठेवीदारांनी दबाव आणला तरच तुमच्या कष्टाचे पैसे परत मिळू शकतात.

तीन महिन्यात हा सगळा पैसा ठेवीदारांना मिळेल. पतसंस्थेच्या वतीने एका शेतकऱ्याला पाच कोटीचे कर्ज घेतले म्हणून आरोपी करण्यात आले आहे. मात्र या शेतकऱ्याने केवळ एक लाखाचे कर्ज घेतले होते, ते देखील मुदतीत फेडले आहे. अशा प्रकारे अनेकांची फसवणूक मानकापे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनाच आरोप करून पोलिसांनी अटक करू नये. अटक करायची असेल तर निबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, बँक मॅनेजर तसेच मानकापेचा मुलगा आणि सूनेलाही अटक करा, अशी मागणी देखील इम्तियाज यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT