

Marathwada : मराराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतणे संबंध आणि त्यांचे बंड हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादीतून समर्थक आमदारांना घेऊन अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत सहभागी होण्याने या अंकात आणखी एका बंडाची भर पडली. (Dhananjay Munde News) या निमित्ताने काका-पुतण्याच्या वादातून बंड किंवा पक्ष सोडून बाहेर पडलेल्या नेत्यांची चर्चा होऊ लागली आहे.
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बंडाला देखील या निमित्ताने उजाळा मिळत आहे. एका मुलाखतीत मुंडे यांनी नव्याने या जुन्या आठवणींना उजाळा दिला. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी माझे वडिल, माझ्याशी संबंध तोडले. माझा, माझ्या कुटुंबाचा, रक्ताचा आणि भाजपचा पंडित अण्णा मुंडे, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी संबंध नसल्याचे जाहीर केले. तेव्हा आमची लायकी तपासण्यासाठी मला निर्णय घ्यावा लागला.
माझे वडिल मोठे असून देखील गोपीनाथ मुंडे यांच्या कर्तृत्वासमोर झुकले, वाकले. तरी देखील आम्हाला नालायक ठरवले गेले. (Maharashtra) अशावेळी स्वतःला सिध्द करण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. त्यानूसार ११ जानेवारी २०१२ रोजी मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला.
असा निर्णय घेणारा मी एकमेव नाही. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अशी अनेक उदाहरणे आहेत. राहुल गांधी, वरुण गांधी, सिंधिया कुटुंबात देखील हे घडल्याचे आपल्याला दिसेल. अजित पवारांचे बंड कशामुळे झाले? कोणत्या परिस्थितीत त्यांनी याचा निर्णय घेतला हे त्यांनी आपल्या भाषणातून तारखा, प्रसंग आणि आधी जाहीर केलेले निर्णय नंतर कसे बदलले गेले? हे सविस्तर सांगितले. त्या गोष्टींचा विचार झाला असता, तर पुढच्या गोष्टी टाळता आल्या असत्या, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.