Pankaja Munde-Dhananjay Munde
Pankaja Munde-Dhananjay Munde sarkarnama
मराठवाडा

तत्कालीन मंत्री स्वतःला परळीच्या मालक समजायच्या : धनंजय मुंडेंचा पंकजांवर निशाणा

सरकारनामा ब्यूरो

पुणे : विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारकडून मला वेगवेगळ्या विभागाचा निधी मिळायचा. तो मी परळीला नेला नाही, तर तो सर्व निधी मी दत्तात्रेय भरणे यांना द्यायचो. तो निधी मी परळीला नेला असता. मात्र, तेव्हाचे तेथील जे मंत्री होते. ते स्वतःला परळीचे मालक समजत होते. विरोधी पक्षनेत्याचा निधी म्हणून मला तो देऊ दिला नसता. मीही जाऊद्या म्हटलं आणि तो निधी फक्त दत्तामामा भरणे यांना दिला, अशा शब्दांत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. (Social Justice Minister Dhananjay Munde criticizes Pankaja Munde)

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे शुक्रवारी (ता. १८ फेब्रुवारी) कामगार आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात सामजिक न्यायमंत्री मुंडे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, कामगार नेते शिवाजीराव खटकाळे, जिल्हा परिषद सदस्य वैशाली पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

भाजपच्या सचिव पंकजा मुंडे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बहिण-भाऊ असले तरी त्यांच्यातील राजकीय संबंध संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रूत आहेत. हे दोघेही एकमेकांवर टीका करायची एकही संधी सोडत नाहीत. पंकजा मुंडे यांनी टीका करताना धनंजय मुंडे हे ३६ व्या क्रमांकाचे मंत्री आहेत, असे म्हटले होते. त्याला धनंजय मुंडे यांनीही त्याच भाषेत उत्तर दिले होते. त्याच पद्धतीने इंदापुरातील कार्यक्रमात बोलताना धनंजय यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

सामाजिक न्यायमंत्री मुंडे म्हणाले की, माझं आणि मामांचं कसं जुळलं, हे मलाही माहिती नाही. मी पहिल्याच कार्यक्रमाला आलो आणि भावी आमदार म्हणून दत्तात्रेय भरणे यांचा नामोल्लेख केला, तेव्हापासून मीसुद्धा मनाला खुणगाठ बांधली होती. विरोधी पक्षनेता म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारकडून वेगवेगळ्या विभागाचा निधी मला मिळायचा. तो मी परळीला नेला नाही. तर तो सर्व निधी भरणे यांना द्यायचो. कारण, परळीच्या तत्कालीन मंत्र्यांनी विरोधी पक्षनेतेचा निधी घेऊ दिला नसता. मीही जाऊद्या, असे म्हणून तो सर्व निधी फक्त भरणेंना दिला. कदाचित त्यामुळे माझ्यावर अनेकजण नाराज असतील. मात्र, माझ्याही पाठीशी भरणेमामा खंबीरपणे उभे आहेत, हे मला समजले आहे.

वालचंदनगरचे गतवैभव पुन्हा मिळविण्यासाठी मी दत्तात्रेय भरणे यांच्यासोबत झिजवायला तयार आहे. भरणेमामांनी मला फोन केला आणि वालचंदनगरच्या कार्यक्रमाला यावे लागतेय, असे सांगितले. मीही लगेच येण्याचे कबूल केले. मामांनी माझ्याकडे एखादा शब्द टाकला आहे आणि तो मी खाली पडू दिला आहे, असे कधीच झाले नाही, असेही धनंजय मुंडे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT