रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है ; राऊतांनी भाजप नेत्यांना सुनावलं

'पालघरमध्ये किरीट सोमय्याचे मोठा प्रकल्प सुरु आहे. त्यांची किमंत २६० कोटी आहे. या प्रकल्पात त्यांची पत्नी मेधा सोमय्या या प्रकल्पाच्या संचालक आहेत.
Sanjay Raut
Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut)हे तीन दिवसापासून भष्ट्राचाराचा आरोप करीत भाजप (BJP)नेत्यांवर टीका करीत आहेत. भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊत, विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिले. या पत्रकार परिषदेस संजय राऊत, मुंबईच्या महापैार किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.

संजय राऊत यांनी यावेळी भाजप नेत्यांना आव्हान दिले ते म्हणाले, ''तुम्ही आम्हाला कितीही धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरणार नाही, 'रिश्ते में हम तुम्हारे लगते बाप है,' बाप काय असतो, हे तुम्हाला लवकरच समजेल,''

''केंद्रात तुमचं सरकार असेल पण महाराष्ट्रात आघाडी सरकार मजबूत आहे. आम्हाला धमक्या देऊ नका, आम्ही पोकळ धमक्यांना घाबरत नाही, यात तुम्ही फसणार,'' असे राऊत म्हणाले. ''भष्ट्राचाराच्याविरोधात लढणारे 'नवीन महात्मा' आता जन्माला आले आहे. तुम्ही हजारो कोटींचा भ्रष्टाचार काढला ती लढाई पुढे घेऊन चला. किरीट सोमय्यांना आव्हान आहे. सच्चे असेल तर पुढे न्या,'' असे राऊत यांनी सुनावले.

''पालघरमध्ये किरीट सोमय्याचे मोठा प्रकल्प सुरु आहे. त्यांची किमंत २६० कोटी आहे. या प्रकल्पात त्यांची पत्नी मेधा सोमय्या या प्रकल्पाच्या संचालक आहेत. यात त्यांचे किती पैसे आहेत? किरीट सोमय्याचा मुलगा, पत्नी यांच्याकडे कोट्यवधींचे रुपये कोठून येतात, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. मेधा सोमय्या, नील सोमय्या हे या प्रकल्पात संचालक आहेत का ? यात कोणत्या ईडीच्या संचालकांची बेनामी गुंतवणूक आहे? हे महाराष्ट्राला कळू द्या, अशी विचारणा राऊत यांनी यावेळी केली.

Sanjay Raut
मरण पत्कारेन पण शरण जाणार नाही ; राऊतांचा मोदींवर निशाणा

''ते शेपूट घालून बसले ती शेपूट आम्ही काढू. भाजपच्या लोकांनी महाराष्ट्र कसा लुटला, ते लपविण्यासाठी ते आमच्यावर आरोप करीत आहेत. माझं त्यांना आव्हान आहे, आमच्यामागे सीबीआय, ईडी, लावा, आम्ही घाबरत नाही,'' असे राऊतांनी सांगितले.

नारायण राणे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीवर टीका केली. यावर संजय राऊत यांनी राणेंना याबाबत उत्तर दिले. राऊत म्हणाले, ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक आहे. तुम्हाला ठोकायला पण खंबीर आहेत,''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com