Society Election News, Jalna Sarkarnama
मराठवाडा

Society Election News : टोपेंच्या पाथरवाला गावात राष्ट्रवादी-शिंदे-भाजप गटात राडा..

Ncp: बोगस मतदान करणाऱ्याला रोखल्यामुळे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंभर लोकांनी मारहाण केली.

सरकारनामा ब्युरो

Jalna News : राष्ट्रवादीचे नेते माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या मुळ गांव असलेल्या पाथरवाला विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत राडा झाला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शिंदे-भाजप गट एकमेकांना भिडल्याने चांगलाच गोंधल उडाला. अंबड तालुक्यातील पाथरवाला गावी आज सकाळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या मतदानाला शांततेत सुरुवात झाली.

यामध्ये राष्ट्रवादी (Ncp) काँग्रेस पक्षाचे व भाजपा शिंदे गटाच्या शिवसेनेचे समृद्धी ग्रामविकास पॅनलमध्ये लढत आहे. सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान बोगस मतदानावर एका गटाने आक्षेप घेतला आणि वादाला सुरूवात झाली. (Jalna) राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर गेल्याने मोठा गोंधळ उडाला.

शिंदे गटांच्या कार्यकर्तोंना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील केला जात आहे. दरम्यान दुपारी दोन वाजेपर्यंत ७५३ पैकी ४९२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

पुढील मतदान प्रकिया शांततेत सुरू आहे. मतदान केंद्रावर वृद्ध महिलेला मतदान करताना दिसत नसल्या कारणाने मतदानाचा अधिकार दुसऱ्याला देण्यावरून समोरच्या पार्टीने आक्षेप घेतल्याने थोडासा गोंधळ निर्माण झाला होता. परंतु आता मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असल्याचे अॅड.संभाजी टोपे यांनी सांगितले.

तर पाथरवाला (बु.) येथील सोसायटीच्या मतदान प्रक्रिया वेळी बोगस मतदान करणाऱ्याला रोखल्यामुळे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंभर लोकांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप समृद्धी पॅनलचे प्रमुख शिवाजी मोरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT