Bhumre On Mahavikas Aghadis Rally : एकट्या उद्धव ठाकरेंकडून मैदान भरणार नाही, म्हणून तीन पक्षांची सभा..

Chhatarapati Sambhajinagar : बाळासाहेब ठाकरेंनी याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरून हिंदुत्वाचा विचार दिला होता.
Uddhav Thackeray- Minister Sandipan Bhumre News
Uddhav Thackeray- Minister Sandipan Bhumre NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरून हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे विचार मांडले, त्याच मैदानातील सभेतून उद्या उद्धव ठाकरे त्या विचारांना तिलांजली देणार आहेत. एकट्याच्या जीवावर मैदान भरू शकत नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांना काॅंग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घ्यावे लागले, अशी टीका राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी केली.

Uddhav Thackeray- Minister Sandipan Bhumre News
Parbhani News : भांबळेंच्या त्रासाला कंटाळून राष्ट्रवादीचे सरचिटणीस भाजपच्या वाटेवर..

उद्या (ता. २) मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीची `वज्रमुठ`, संयुक्त सभा होत आहे. तर याच दिवशी भाजप व शिंदे गटाकडून शहरात स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. (Uddhav Thackeray) या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेपुर्वी पालकमंत्री भुमरे यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच्या सभेवर भाष्य केले.

भुमरे म्हणाले, या सभेतून विकासाच्या मुद्यावर काहीच बोलले जाणार नाही, अडीच वर्षाच्या सत्तेत यांना काही करता आले नाही, त्यामुळे आता फक्त टीका करण्यासाठी या तीन पक्षांची ही सभा होणार आहे. टीका करणे हा एकमेव त्यांचा अजेंडा आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे त्यांना महाविकास आघाडीची एकत्रित सभा घ्यावी लागत आहे.

असे असले तरी ही सभा यशस्वी होवू शकणार नाही. कारण विरोधकांकडे टीकेशिवाय कुठलेच विकासाचे मुद्दे लोकांना सांगण्यासाठी नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरून हिंदुत्वाचा विचार दिला होता. त्या मैदानात उद्धव ठाकरे त्या विचारांना तिलांजली देण्याचे काम करणार आहेत, असा टोला देखील भुमरे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com