Cm Uddhav Thackeray
Cm Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray : कौतुकाने काहींना मळमळ, पोटदुखी; त्यांच्यावर फुकट उपचार करू

सरकारनामा ब्युरो

जालना : कोरोना काळात राज्य सरकार, आरोग्य विभाग व संपुर्ण यंत्रणेने खूप चांगले काम केले,अनेकांचे प्राण वाचवले. (Jalna) याबद्दल सगळ्यांनी सरकारचे कौतुकही केले, पण या कौतुकाने काहींना पोटदुखी आणि मळमळ सुरू होते. (Marathwada) अशा लोकांनी राज्य सरकारच्या आरोग्य केंद्रांमध्ये योग्य दरात उपचार करून घ्यावेत, किंवा आम्ही ते फुकट करू. सरकार म्हणून आमचे ते कर्तव्यच आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना लगावला.

कुणी कौतुक केले की मला धडधड होते, असा चिमटा काढत त्यांनी सलमान खानच्या दंबग चित्रपटातील `थप्पड से डर नही लगता, साहेब प्यार से डर लगता है`, असा डायलाॅग देखील सुनावला. जालन्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नुतन वास्तूचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आदींनी या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली.

गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून ठाकरे सरकारवर कोरोना काळात कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जातोय. विशेषत: भाजपकडून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज भाजपला फटकारले. उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधक करतात.

माझे त्यांना आव्हान आहे, जे आरोप करतात त्यांनी राज्य सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढावा आणि स्वतःचा एकदा सरकारच्या आरोग्य केंद्रात सरकारी दराने उपचार करून घ्यावा. तेही नको असेल तर आम्ही तुमच्यावर फुकट उपचार करू. कारण ते आमचं सरकार म्हणून कर्तव्यच आहे.

कौतुकाने मी भारावून जात नाही, उलट कोणी माझं कौतुक केलं, की मला धडधडायला लागतं. `थप्पड से डर नही लगता, साहब प्यार से डर लगता है`, असा डायलॉगही त्यांनी म्हटला. हे कौतुक निराळ आहे, थापडा देण खाणं हा आमच्या आयुष्याचाच भाग आहे. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT