कराडांच्या घरासमोर भाजपचा पहारा; काॅंग्रेसने पाणी, कचरा विषयावर मोर्चा का काढला नाही?

कराड यांच्या घरावर चाल करून येण्याचा किंवा आगळीकीचा प्रयत्न केला, तर भाजप ठोशाला ठोशाने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. (Bjp Aurangabad)
Bjp Mla Atul Save, Aurangabd
Bjp Mla Atul Save, AurangabdSarkarnama

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात कोरोना काॅंग्रेसमुळे वाढला, त्यांनी महाराष्ट्रातून परराज्यातील लोकांना तिकीटे काढून पाठवले, अशी टीका संसदेत केली होती. त्यानंतर देशभरात काॅंग्रेसने भाजप व मोदींच्या (Pm Modi) विरोधात रान उठवले. ठिकठिकाणी भाजपच्या मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढले जात आहेत.(Bjp) आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या घरावर देखील काॅंग्रेसने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला.

या मोर्चाला विरोध म्हणून भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील कराड यांच्या निवासस्थानासमोर जमले होते. शुल्लक गोष्टीवरून मोर्चा काढणाऱ्या काॅंग्रेसने नागरिकांच्या रस्ते, पाणी, कचरा या विषयावर कधी मोर्चा काढला का? असा सवाल भाजपने केला आहे. (Marathwada) कराड यांच्या घरावर चालून येण्याचा प्रयत्न केला तर ठोशाला ठोसाने उत्तर देवू, असा इशारा भाजपचे आमदार अतुल सावे यांनी दिला.

`महाराष्ट्रातील कामगार कॉंग्रेसने मदत करून घरी पाठविल्याने देशभर कोरोना वाढला`, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज काॅंग्रेसने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला पण. पोलिसांनी हा मोर्चा रस्त्यातच अडवण्यात आला. तर या मोर्च्याच्या विरोधात भाजपने देखील जोरदार तयारी करत डॉ. कराडांच्या घरासमोर गर्दी केली होती.

Bjp Mla Atul Save, Aurangabd
खैरे आमचे नेतेच, सत्तार आणि मी सोबतच वाद फक्त मिडिया अन् पेपरातच..

दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने येवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. काॅंग्रेसचे आंदोलन म्हणजे स्टटंबाजी आहे, एका शुल्लक गोष्टीचे भांडवल करून काॅंग्रेस रस्त्यावर उतरली. परंतु गेल्या अनेक वर्षात नागरिकांचे प्रश्न, समस्या यावर हा पक्ष कधी रस्त्यावर उतरलेला दिसला नाही.

कराड यांच्या घरावर चाल करून येण्याचा किंवा आगळीकीचा प्रयत्न केला, तर भाजप ठोशाला ठोशाने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील अतुल सावे, शिरीश बोराळकर यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com