Somnath Surywanshi Case : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल मुळ याचिकेत दुरुस्ती अर्ज दाखल केल्यानंतर शुक्रावारी (ता. 13) दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाला. त्यानंतर हे प्रकरण न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे आणि न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांनी निकालासाठी राखून ठेवला आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूचा प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे आणि संबंधीत पोलीसांवर गुन्हे दाखल यासाठी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजया सूर्यवंशी यांनी याचिका दाखल केलेली आहे. त्यांची बाजू ॲड. प्रकाश आंबेडकर मांडत आहेत. या प्रकरणात प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी नोंदविलेल्या जबाबनंतर त्यावर पुढील कार्यवाही कुणी व कशी करावी याबाबत कायद्यात स्पष्टता नाही.
त्यामुळे याबाबत खुलासा करण्याच्या संदर्भात संबंधित गृहमंत्र्यांना यांना न्यायालयात बोलाविण्याची विनंती केली होती. मात्र मुळ याचिकेत ही मागणी नसल्याने दुरुस्ती करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ देण्यात आला होता. मुळ याचिकेत दुरुस्ती अर्ज सादर केल्यानंतर शुक्रवारी (ता. 13) त्यावर सुनावणी झाली. ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी युक्तीवाद करताना या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी गृहमंत्र्यांना बोलवण्याची विनंती केली.
त्यानंतर सरकारतर्फे अमरजितसिंह गिरासे यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर दुरुस्ती अर्जावरील निकाल खंडपीठाने राखून ठेवला आहे. मुळ याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काम पाहिले, त्यांना ॲड. मिलिंद संदानशिव यांनी सहकार्य केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.