IAS M. Devendra Singh : IAS अधिकारी एम. देवेंद्र सिंह यांचं निलंबन मागे घेतले असले तरी त्यांच्या पुनर्नियुक्तीवरून आता राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. त्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळावर सदस्य सचिव या पदावरील पुनर्नियुक्तीस पर्यावरण विभागाचा विरोध असल्याची माहिती आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम हे सिंह यांच्या पुनर्नियुक्तीसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. पण यानंतर सिध्देश कदम यांनी सिंह यांच्या पुनर्नियुक्तीला पर्यावरण विभागाचा विरोध नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणासंबंधित एका प्रश्नाचे ब्रिफिंग मंत्री पंकजा मुंडे यांना दिले नाही. तसेच त्यावेळी एम. देवेंद्र सिंह हे उपस्थितही राहिले नाहीत, असा ठपका ठेवत विधानसभेचे तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. त्या आदेशाची दखल घेऊन शासनाने तातडीने निलंबनाची कार्यवाही केली. मात्र एम. देवेंद्र सिंह यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचे निलंबन मागे घेण्याचे निर्देश दिले.
आता निलंबन मागे घेतल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून त्यांची पुनर्नियुक्ती करण्यास पर्यावरण विभागाचा विरोध असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते अद्याप पुनर्नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या विरोधाला राजकीय वादाची किनार असल्याची चर्चा आहे.
कोण आहेत एम. देवेंद्र सिंह?
देवेंद्र सिंह 2011 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. यापूर्वी 3 वर्षे ते रत्नागिरीचे जिल्हाधिकारी होते. तत्कालीन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात टोकाचे मतभेद झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर ढाकणे यांना बाजूला करून एम. देवेंद्र सिंह यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. आता त्यांना होणारा विरोध लक्षात घेऊन सदस्य सचिव या क्रीम पोस्टसाठी सनदी अधिकाऱ्यांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.