Supporters celebrate after Parameshwar Kadam defeats long-time strongman Chandrakant Rathod in Sonpeth Municipal Council election, dealing a setback to NCP MLA Rajesh Vitekar. Sarkarnama
मराठवाडा

Rajesh Vitekar News : अजित पवारांच्या लाडक्या आमदाराला घरच्या मैदानावरच धक्का; सर्वाधिक जागा, पण नगराध्यक्षपदाचा उमेदवार पडला

Sonpeth Nagarparishad Results : सोनपेठ नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून सर्वाधिक जागा मिळवूनही नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाल्याने आमदार राजेश विटेकर अडचणीत आले आहेत.

Jagdish Pansare

Sonpeth Municipal Corporation News : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ नगर परिषदेत सर्वाधिक 12 नगरसेवक निवडून आणत आमदार राजेश विटेकर यांनी दमदार कामगिरी केली. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारच पराभूत झाल्याने विटेकर यांना घरच्या मैदानावरच धक्का बसला आहे. तब्बल 25 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या चंद्रकांत राठोड यांच्या राजकीय वर्चस्वाला परिवर्तन आघाडीचे उमेदवार परमेश्वर कदम यांनी झटका दिला आहे.

या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाच्या परिवर्तन आघाडीचे परमेश्वर कदम यांनी राठोड यांचा पराभव केला. विशेष म्हणजे हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांच्यासाठी जिव्हारी लागणारा आहे. परमेश्वर कदम यांनी 305 मतांनी आघाडी घेऊन विजय मिळवला. यात चंद्रकांत राठोड यांना 5678 तर परमेश्वर कदम यांना 5983 मते मिळाली.

चंद्रकांत राठोड यांनी गेल्या पंचवीस वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व टिकवून ठेवले होते. मात्र, यावेळी मतदारांनी त्यांना साफ नाकारले. परमेश्वर कदम यांनी प्रचारादरम्यान युवकांचे प्रश्न आक्रमकपणे मांडले. सत्ता नव्हे तर सेवा हा संदेश थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी ठरले. विजयानंतर परमेश्वर कदम समर्थकांनी गावात जल्लोष केला.

दहा प्रभागातील वीस नगरसेवकांचा निकालही जाहीर झाला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 तर परमेश्वर कदम यांच्या परिवर्तन आघाडीचे 8 नगरसेवक विजयी झाले आहेत.अवघ्या तीनशे मतांनी नगराध्यक्ष पदाचा उमदेवार पराभूत झाल्याने राजेश विटेकर यांच्या हातून सोनपेठ नगर परिषदेची सत्ता सूत्रं गेली आहेत. सोनपेठ नगरपरिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवत राजेश विटेकर पक्षाचे नेते अजित पवार यांना हा विजय भेट देणार होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT