BJP News : भाजपने एकाच घरात दिली होती 6 जणांना उमेदवारी... मतदारांनी सगळ्यांनच घरी बसवलं!

Loha Election Result : लोहा नगरपरिषद निवडणुकीत भाजपने एकाच घरातील सहा उमेदवार दिल्याने मतदार संतप्त झाले. घराणेशाहीविरोधात जनतेने कौल देत भाजपला मोठा धक्का दिला.
BJP faces major embarrassment in Loha municipal elections as voters reject nepotism
BJP faces major embarrassment in Loha municipal elections as voters reject nepotismSarkarnama
Published on
Updated on

Loha Municipal Corporation Election News : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत लक्ष्मी दर्शनासोबतच घराणेशाहीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. 'पार्टी विथ डिफरन्स'असे बिरूद मिरवणाऱ्या भाजपमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले होते. कहर तर तेव्हा झाला जेव्हा लोहा नगरपरिषेदत भाजपने एकाच घरातील तब्बल सहा जणांना उमेदवारी दिली. याने राज्यभरात चर्चा आणि भाजपची नाच्चकी झाली.

पण भाजपच्या या घराणेशाहीला मतदारांनी चांगला धडा शिकवला. लोह्याच्या जनतेने या सगळ्या सहाही उमेदवारांना पराभूत करत घरी बसवले आहे. लोहा नगरपरिषदेच्या निकालाकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. त्याचे कारणही खास होते, कारण इथे भाजपने एकाच घरातील सहा जणांना निवडणुकीचे तिकीट दिले होते. नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली.

तर, नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली होती. मतदारांना गृहित धरणाऱ्या भाजपला मतदारांनी मात्र चांगलाच धडा शिकवत या सगळ्यांनाच घरी बसवले. मतदारांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांच्यासह सगळ्यांनाच पराभूत केले आहे.

BJP faces major embarrassment in Loha municipal elections as voters reject nepotism
Shivsena Vs Shivsena UBT : विजयानंतर तासाभरातच पक्ष सोडणार : ठाकरेंचा नगराध्यक्ष करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष पदावर निवडून आला आहे. लोहा नगर परिषदेच्या सत्तेसाठी भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा बाल्लेकिल्ला मानला जातो. आतापर्यंतच्या निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व राहिले आहे. लोहा नगर परिषद एकूण दहा प्रभाग असून 20 नगरसेवकांसाठी ही निवडणूक झाली.

BJP faces major embarrassment in Loha municipal elections as voters reject nepotism
Maharashtra Election Results: राज्यातील नगर परिषद,नगर पंचायत निवडणूक निकालाच्या आत्तापर्यंतच्या मोठ्या 10 अपडेट्स, वाचा एका क्लिकवर

भाजपने (BJP) या निवडणुकीत सर्व जागेवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असले तरी एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली होती. ज्यात नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी, पत्नी गोदावरी गजानन सूर्यवंशी यांना (प्रभाग 7 अ), भाऊ सचिन सुभाषराव सूर्यवंशी (प्रभाग क्रमांक 1 अ) मधून, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी (प्रभाग 8 अ) मधून, मेव्हुणा युवराज वसंतराव वाघमारे (प्रभाग क्रमांक 7 ब) तर भाच्याची पत्नी रिना अमोल व्यवहारे (प्रभाग क्रमांक ३) मधून उमेदवार होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com