Soybean 
मराठवाडा

बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली

लवकरच हिवाळी सोयाबीन बाजारात येत असल्याने सोयाबीनमध्ये भाववाढ होणार नाही तरी शेतकऱ्यानी सोयाबीन विक्रीस आणावे, असा सल्ला व्यापाऱ्यांनी दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

परभणी : परभणी (Parbhani) जिल्हातील अकरा कृषी उत्पन्न बाजार समितीतील (krushi Uttpanna Bazaar Samiti) मार्केट वार्डात दररोज सोयाबीनच्या भावात चढउतार होत आहे. सोयाबीनचा साडेपाच ते सहा हजारांचा भाव आहे. परंतु भाववाढ होईल याची प्रतीक्षा करत शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन (Soybean) घरात ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बाजार समितीतील (Bazaar Samiti) आवक घटल्याची माहिती अडते व्यापारी पवन करवा यांनी दिली आहे.

आता लवकरच हिवाळी सोयाबीन बाजारात येत असल्याने सोयाबीनमध्ये भाववाढ होणार नाही तरी शेतकऱ्यानी सोयाबीन विक्रीस आणावे, असा सल्ला व्यापाऱ्यांनी दिला आहे. यावर्षी जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती पण सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीनचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जवळपास दोन लाख हेक्टर पिके मातीत मिसळली. परिणामी उत्पन्नात घट झाली. जे हातात आले ते बाजारात आणल्यावर व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे दररोज भाव पाडले.

तर मागील दोन महिन्यात सोयाबीनला साडेसहा हजाराचा भाव मिळत होता. पण मागील काही दिवसांत सोयाबीनचे भाव सहा हजारांवर स्थिर झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात ठेवले आहेत. ज्या जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. तिथए पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या हाती सोयाबीनचे पीक आले. सुरुवातीला साडेसहा हजार क्विंटल भाव आता सहा हजारांवर अडकला असल्याचे अडत व्यापारी ओम राठी यांनी सांगितले.

आधीच हातात थोडफार पडलेल्या सोयाबीनचे भाव वाढतील ही आशा शेतकऱ्यांना असून काही व्यापारीही खाजगीत भाव वाढतील असे सांगत असल्याने शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन घरी ठेवले आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्याच्या भावाबद्दल नवीन कायदा तयार करून खर्चाच्या प्रमाणात शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव वाढून घावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT