Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Kailas Patil Video : ठाकरेंचा पठ्ठ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भिडला, चॅलेंज देत 'त्या' दाव्यातील हवाच काढली!

Soybean purchase issue Kailas Patil Devendra Fadnavis : सोयाबीन खरेदीमध्ये 15 टक्के आर्द्रता असणारे सोयाबीनही हमीभाव केंद्रावरून विकत घेतल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Roshan More

Kailas Patil News : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सोयाबीन खरेदीचा मुद्दावर बोलताना आर्द्रतेचा निकष 12 टक्के होता. मात्र शेतकरी हित लक्षात घेऊन वाढवला आणि 12 टक्के आर्द्रता असणारे सोयाबीनही हमीभाव केंद्रावरून विकत घेतल्याचे म्हटले मात्र, त्यांच्या याच दाव्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी चॅलेंज दिले आहे.

कैलास पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 15 टक्के आर्द्रता असणारे सोयाबीनही हमीभाव केंद्रावरून विकत घेत आहात व त्यामुळे विक्रमी खरेदी झाल्याचे आपण म्हटले आहे. पण, त्याची एकदा पडताळणी करायला हवी होती. केंद्रावरील वास्तव आपण म्हणता त्यापेक्षा वेगळे आहे.

धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील एकाही हमीभाव केंद्रावरून १५ टक्के आर्द्रता असणारे सोयाबीन खरेदी केले गेले नाही, आजही करीत नाहीत. आपण स्वतः काही केंद्रांना भेटी देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली आहे. त्यामुळे हे वास्तव आपणास अवगत करून देणे आवश्यक वाटते, असे कैलास पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

नव्या सरकारची सुरुवात थापांनी

कैलास पाटील यांनी म्हटले आहे की, मागच्या सरकारमध्येही आपण मुख्य होतात. तेव्हा अनेक खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली. आता आपल्या नेतृत्वाखालील सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सर्वांना लागून आहे. मात्र, आपणही पुन्हा तोच कित्ता गिरवत आहात, असे दिसते. नव्या सरकारची सुरुवातच अशा थापानी होणार असेल तर पुढे शेतकऱ्यांनी आपल्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवावी, हा मोठाच प्रश्न आहे. त्यामुळे जमिनीवर या, वास्तव पहा अन् मगच बोला..

जुमलेबाजीचा पॅटर्न...

कैलास पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालात देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन देखील केले आहे. तसेच सोयबीनच्या मुद्यावरून शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका, ही विनंती असे म्हणत टोला देखील लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT