Shivsena Leader Chandrakant Khaire
Shivsena Leader Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

सोयगाव नगरपंचायत : शिवसेनेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष दोघेही बिनविरोध

सरकारनामा ब्युरो

सोयगांव : शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानसभा मतदारतील सोयगाव नगरपंचायतीत शतप्रतिशत भगवा फडकल्यानंतर आता नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षही शिवसेनेचाच झाला. (Shivsena) सत्तार यांनी भाजपच्या सहा पैकी चार नगरसवेकांना (Abdul Sattar) शिवसेनेत आणल्यामुळे विरोधकच शिल्लक न राहिल्याने शिवसेनेने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष दोन्ही बिनविरोध केले. (Chandrakant Khaire)

नगराध्यक्ष पदी आशाबी तडवी, तर उपनगराध्यक्ष म्हणून सुरेखा काळे यांची निवड करण्यात आली आहे. दोघांच्याही नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत विजयी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांची जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीसाठी काल ७ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा होणार होती.

परंतु भारतरत्न, गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारने काल सुट्टी जाहीर केल्यामुळे ती सभा आज घेण्यात आली. पिठासन अधिकारी संजीव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या आशाबी तडवी यांचा तर उपनगराध्यक्ष पदासाठी सुरेखा काळे या दोघांचेच अर्ज आले होते.

विरोधात अर्जच नसल्याने या दोघांची अनुक्रमे निवड जाहीर करण्यात आली. यावेळी भाजपचे दोन्ही सदस्य सभागृहात गैरहजर होते. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने १७ पैकी ११ जिंकत बहुमताने सत्ता मिळवली होती. भाजपला सहा जागा मिळाल्या, पण सत्तार यांनी काही दिवसांपुर्वी भाजपचे चार नगरसेवक फोडले.

त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत भाजपकडे उमेदवार देण्याइतपत संख्याबळच उरले नाही. शिवाय उर्वरित भाजपचे दोन सदस्य देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे हे दोन सदस्य देखील आज गैरहजर राहिले.

सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या दोन्ही महिलाच विराजमान झाल्या असून सभागृहात आठ महिला नगरसेविका राहणार आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष या दोन्ही पदांवर देखील सत्तार यांनी महिलांनाच संधी दिल्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT