अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध; माजी जिल्हा प्रमुखालाच अटक

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे नांदत असले तरी बीडमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
Shiv Sena Supporters
Shiv Sena SupportersSarkarnama

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शिवसेना हे राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे नांदत असले तरी बीडमध्ये (Beed) दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यक्रमालाच विरोध केला. त्यामुळे पोलिसानी माजी जिल्हाप्रमुखांसह काही पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेचा (Shiv Sena) जिल्ह्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

आंदोलन करणाऱे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. मंगळवारी बीड शहरात शहर व बीड मतदार संघाशी निगडीत विविध शंभर कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद॒घाटन व लोकार्पण पवार यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होत आहे. आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्या पुढाकाराने ही विकास कामे होत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे.

Shiv Sena Supporters
राज्यपाल आणणार बच्चू कडूंना अडचणीत? भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी

बीड मतदार संघात शिवसेना व राष्ट्रवादीत विळ्या - भोपळ्याचे सख्य आहे. मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी विशेष मंजुरी दिलेल्या कामांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाकडून म्हणजेच क्षीरसागर यांच्याकडून आडकाठी आणली जात असल्याचा मुळूक यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी ‘दादा तुमच्या आमदारांना महाविकास आघाडीचा (MahaVikas Aghadi) धर्म शिकवा’ अशा पोस्ट करत जाहीर निषेध केला.

सोमवारी (ता. सात) कार्यक्रम निश्चित होताच सचिन मुळूक यांनी अजित पवार जिल्ह्यात आले तर त्यांना काळे झेंडे दाखवू किंवा ऑनलाईन असतील तरी दाखवू अशी भूमिका दोन जाहीर केली होती. त्यानंतर गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा असल्याने सोमवारचा कार्यक्रम पुढे ढकलून मंगळवारी ठेवला गेला. त्यापार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी पुन्हा सचिन मुळूक यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे जाहीर केले.

शहर व शिवाजी नगर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावल्यानंतरही त्यांनी आंदोलन करणारच अशी भूमिका कायम ठेवली. अखेर मंगळवारी सकाळी मुळूक यांच्यासह शुभम डाके, विपुल पिंगळे आदी पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून निषेधाच्या घोषणा दिक्या. त्यानंतर शिवाजी नगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com