BJP  Sarkanama
मराठवाडा

Article 370 Special Screening News : अमित शाहांच्या दौऱ्याअगोदर कार्यकर्त्यांना 'चार्ज' करण्यासाठी 'Article 370'चं स्पेशल स्क्रीनिंग!

Amit Shahs visit to Chhatrapati Sambhajinagar : भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी वातावरण निर्मितीमध्ये कुठलीच कसर सोडलेली नाही.

Jagdish Pansare

BJP News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवारी (ता.4) रोजी संभाजीनगरात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नगर या तीन लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टरची एकत्रित जाहीर सभा आणि महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रचाराचा नारळ शाह यांच्या हस्ते फोडण्यात येणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 5 रोजी होणाऱ्या सभेसाठी अमित शाह एकदिवस आधीच संभाजीनगरात दाखल होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी वातावरण निर्मितीमध्ये कुठलीच कसर सोडलेली नाही. जम्मू कश्मिरमधील कलम 370 हटवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे अमित शाह शहरात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री अतुल सावे यांनी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. सावे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी खास आर्टिकल 370 चित्रपटाचे आयोजन केले होते. सहाशेहून अधिक जणांनी या चित्रपटाचा आनंद लुटला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ` अब की बार, चारसो पार`चा नारा दिला आहे. गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या योजना आणि लाभार्थ्यांची माहिती देण्यासाठी देशभरात भाजपच्या वतीने मोहिम राबवण्यात येत आहे. विकसित भारत संकल्प यात्रा, गाव चलो अभियान अशी विविध उपक्रमातून भाजपाने राम मंदिर, कलम-370, सीएए, ट्रिपल तलाक या महत्वाच्या निर्णायसह अनेक योजनाचा प्रचार सुरू केला आहे.

महाराष्ट्रात भाजपने लोकसभेसाठी मिशन -45 चे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवत वाटचाल सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून 5 मार्च रोजी शहरात होणाऱ्या अमित शाह यांच्या सभेकडे पाहिले जात आहे. या निमित्ताने मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी भाजपने चालवली आहे. सभेच्या आधी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी अतुल सावे यांनी आपल्या मतदारसंघातील सहाशेहून अधिक जणांना आर्टिकल 370 हा चित्रपट मोफत दाखवला.

कलम 370 हटवून जम्मू काश्मीरच्या बाबतीत असलेले प्रमुख प्रश्न मार्गी लावण्यामध्ये अमित शाह यांची प्रमुख भूमिका होती. देशाची एकात्मता आणि अखंडता यांच्या मजबुतीकरणासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. त्यांच्या कार्याची झलक दाखवून देणारा हा चित्रपट सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे, असे सांगत शाह यांच्या स्वागतासाठी छत्रपती संभाजीनगर सज्ज झाले असल्याचे अतुल सावे यांनी यावेळी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT