Beed : बीडमधून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीपाठोपाठ विनायक मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेत देखील फूट पडली आहे. दिवंगत विनायक मेटे यांचे सख्खे भाऊ शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडले आहेत. ते 'जय शिवसंग्राम' नावाने नवीन पक्ष संघटना स्थापन करणार आहेत.
रामहरी मेटे रायगडावर आपल्या नवीन संघटनेची घोषणा करणार आहेत. रामहरी मेटे हे विनायक मेटे यांचे छोटे बंधू आहेत. रामहरी मेटे यांनी शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. रामहरी मेटे रायगडावर आपल्या नवीन संघटनेची घोषणा करणार असल्याची माहिती आहे. 'जय शिवसंग्राम' या नावाने रामहरी मेटे नवी संघटना स्थापन करणार आहेत.
विनायक मेटे हयात असेपर्यंत रामहरी मेटे यांनी त्यांच्यासोबत शिवसंग्रामचे काम पाहिले. त्यानंतर त्यांनी शिवसंग्राम संघटनेतून काही कारणास्तव बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. रामहरी मेटे लवकरच रायगडावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. रामहरी मेटे यांच्यासोबत संघटनेतील किती पदाधिकारी बाहेर पडले, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विनायक मेटे यांनी रायगडावर ‘शिवसंग्राम’ची स्थापना केली आहे. त्यामुळे त्यांनी राज्यभर निर्माण केलेल्या मावळ्यांच्या जिवावर ही संघटना पुढे वाटचाल करणार आहे. शिवसंग्राम संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु शिवसंग्राम कधीही संपणार नाही. हा एक वटवृक्ष आहे, ज्याच्या विचारांची मुळे जमिनीत घट्ट रोवलेली आहेत. येणाऱ्या काळात जरूर संघर्ष करावा लागेल. विनायक मेटे यांच्याकडून आम्ही संघर्ष शिकलेलो आहोत. यानुसार पक्षबांधणी अधिक मजबूत करण्याच्याबाबतीत अनेक निर्णय घेण्यात आले असल्याचे या पत्र एका बैठकीच्यानिमित्ताने विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी नुकतेच कार्यकर्त्यांना पाठवले होते.
महायुतीचा घटकपक्ष असलेला शिवसंग्राम पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीत तीन, तर विधानसभा निवडणुकीत बारा जागा लढविणार आहे. मात्र या जागा कोणत्या असाव्यात, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. शिवसंग्राम पक्षाच्या मागणीनुसार लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी जागा सोडण्याचा आग्रह महायुतीकडे धरण्यात येणार आहे. डॉ. ज्योती विनायक मेटे या बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ठरले आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.