Kolhapur Politics : मतदारांच्या डोळ्यासमोर काँग्रेसचा हात; भाजपला जशास तसे उत्तर...

Congress Vs BJP : घरावर काँग्रेसचा हात उमटवायला सुरुवात...
Congress Vs BJP
Congress Vs BJPSarkarnama

Kolhapur : मागील निवडणुकीनंतर भाजपला घराघरात पोहोचवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून वातावरणनिर्मिती तयार करण्यात आली होती. या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या घरावर पक्षाचा झेंडा दारावर पक्षाचा फलक आणि अनेक भिंतींवर कमळ चिन्ह रेखाटले होते. बूथ मंडल अध्यक्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ही मोहीम राबवण्यात आली होती. बाहेर फिरणाऱ्या मतदारांच्या सतत डोळ्यासमोर कमळ दिसायला हवे, असे नियोजन गल्ली-कोपऱ्यापर्यंत करण्यात आलं होतं. आता हाच धागा पकडून काँग्रेसनेही जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर-दक्षिण विधानसभा मतदारसंघासह अन्य विधानसभा मतदारसंघांतील अनेक घरांवर काँग्रेसचा हात उमटवायला सुरुवात केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरावर काँग्रेसचे चित्र रेखाटण्यात आले आहे. मतदारांच्या डोळ्यासमोर पुन्हा काँग्रेसचा हात दिसावा, यासाठीचे नियोजन सुरू आहे.

फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात एप्रिल- मेमध्ये मतदान प्रक्रिया होणार हे जवळपास निश्चित आहे. यामुळे सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेसह सर्वच पक्षांची तयारी सुरू आहे. यामध्ये सध्या भाजपने मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यात पक्षाची हवा निर्माण करण्याचा उद्देश आहे. त्यात आता काँग्रेसही मागे राहत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदारांना सतत डोळ्यासमोर काँग्रेसचा हात दिसायला हवा, असे नियोजन करण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकारानंतर आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून संकल्प यात्रा सुरू आहे. भाजप दारोदारी जाऊन अनेक योजनांची माहिती देण्यात आघाडीवर आहे. या परिस्थितीत काँग्रेसने भाजपला जशास तसे उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. मात्र मतदारांवर याचा किती परिणाम होणार, हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

Edited by : Mangesh Mahale

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com