Subhash Desai-Shinde-Fadanvis News Sarkarnama
मराठवाडा

Subshash Desai On Rally : आधी विकास करून दाखवा, मग `गतीमान सरकार` म्हणा..

Shivsena : माझा मुलगा शिंदे गटात गेला ही दुर्दैवी घटना आहे. तो का गेला? याचा मीच अंदाज घेत आहे.

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : आपले शहर आदर्श शहर व्हावे यासाठी प्रत्येकांनी जबाबदारी घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शहर विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या योजना रखडल्या आहेत, त्यांना गती देण्याचा आम्ही अग्रह धरत आहोत. शहराची गरज लक्षात घेवून शहराच्या विकासाला गती देवून आपण `गतीमान`, आहोत हे दाखवून द्यावे, असा टोला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते माजी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) राज्यभरात संयुक्त सभा होणार आहेत. त्याची सुरूवात रविवारी ( ता.दोन ) छत्रपती संभाजीनगरातुन होत आहे. या सभेच्या पुर्वतयारीची पाहणी करण्यासाठी देसाई शहरात आले आहेत. (Subhash Desai) यावेळी माध्यमांशी संवाद साधताना देसाई म्हणाले, रविवारची सभा वातावरण भडकावणारी नव्हे तर दोन दिवसांपुर्वी झालेली घटना दुर्दैवी असून तसे शहराला पुन्हा गालबोट लागू नये असे आवाहन करणारी असेल.

कोणत्याही निवडणूका आल्या तरी महाविकास आघाडी त्याला सामोरे जाऊन जिंकून दाखवेल, असा विश्वास जनतेला या सभेतून दिला जाणार आहे. सर्व समाजघटक महाविकास आघाडीसोबत येत आहेत, ते येणे ही आघाडीची भुमिका आहे. तणाव निर्णाण करणाऱ्या घटना कोणत्याही शहरात घडू नयेत. शहर सुरक्षित आणि शांत रहावे हीच आघाडीची भुमिका आहे. शहरांतील चांगले वातावरण औद्योगिक गुंतवणुकींसाठी पोषक असते.

यापुर्वी मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात शहरासाठी पाणीपुरवठा योजना, शिवसेनाप्रमुखांचे स्मारक, रस्ते अशी नविन कामे सुरू केली होती. मात्र त्यांची गती सद्या मंदावल्याचे कळते. याना गती देण्यासाठी आम्ही आग्रह धरणार आहोत, या कामांना गती देण्याची गरज आहे.

२८ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटल्याच्या संदर्भात विचारले असता त्यांनी संपर्कात असलेल्यांची नावे आम्ही फोडू इच्छित नसल्याचे सांगुन प्रश्‍नाला बगल दिली. देसाई यांचा मुलगा शिंदे गटात गेल्याबद्दल विचारले असता सुभाष देसाई म्हणाले, माझा मुलगा शिंदे गटात गेला ही दुर्दैवी घटना आहे. तो का गेला? याचा मीच अंदाज घेत आहे. तुम्ही त्याला पाठवल्याचे बोलले जाते असे पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी या आरोपाच स्पष्ट शब्दात इन्कार केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT