Mla Tanaji Sawant
Mla Tanaji Sawant Sarkarnama
मराठवाडा

जिल्ह्यातले साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्रातील पुढाऱ्यांच्या घशात; तेरणा तानाजी सावंतांनी घेतला

सरकारनामा ब्युरो

उस्मानाबाद ः एकीकडे जिल्ह्याच्या साखर कारखानदारीवर परजिल्ह्यातील उद्योजकांनी जम बसवला असतांनाच तेरणा कारखाना ताब्यात घेत शिवसेनेच्या प्रा. तानाजी सावंत यांनी बाजी मारली आहे. उस्मानाबाज जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकी हा निर्णय घेण्यात आला. २५ वर्षासाठी हा कारखाना तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगरला भाडे तत्वावर देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात प्रा. सावंत यांचा दबदबा आणखी वाढणार आहे.

तेरणा व तुळजाभवानी हे दोन्ही कारखाने सोलापुर जिल्ह्यातील उद्योजकांनी भाड्याने घेतल्याने निश्चितच जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय नेत्यांवर जनतेने किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे. ११ पैकी ९ कारखाने हे बाहेरच्या जिल्ह्यातील कारखानदारांच्या ताब्यात असल्याने राजकारण करण्यात कुठेही कमी न पडणारे व जिल्ह्यात मोठे उद्योग यावे अशी वारंवार मागणी करणारे नेते बंद पडलेला उद्योग सूरु करण्यासाठी इच्छाशक्ती का दाखवित नसावे हा प्रश्न यानिमित्ताने पुढे येऊ लागला आहे.

जिल्ह्यामध्ये दोन कारखाने अजित पवार यांनी चालविण्यास घेतले आहेत, धाराशिव कारखाना पंढरपुरचे उद्योजक अभिजीत पाटील यांनी विकत घेतला. शिवशक्ती व तेरणाची मालकी आता प्रा.तानाजी सावंत यांच्याकडे आली आहे. याशिवाय त्यांचा सोनारी येथे भैरवनाथ कारखाना आहे, तुळजाभवानी कारखाना गोकुळ उद्योग समुहाच्या शिंदे परिवारांनी घेतला आहे.

जिल्ह्यात कंचेश्वर,लोकमंगल माऊली यावरही सोलापुर जिल्ह्यातील कारखानदाराची मालकी आहे. जिल्ह्यातील अरविंद गोरे यांचा डॉ.आंबेडकर,माजी मंत्री बसवराज पाटील यांचा विठ्ठलसाई व बी.बी.ठोंबरे यांच्या मालकीचा नॅचरल शुगर्स हे तीन अपवाद वगळता जिल्ह्यात सध्या कोणाचाही कारखाना राहिल्याचे दिसुन येत नाही.

हावरगाव येथील कारखाना दिलीप नाडे यांच्याकडे असला तरी राणाजगजितसिह पाटील हे देखील त्यात पार्टनर आहेत. मधल्या काळात एस.पी.शुगर्स नावाने गुळपावडर कारखाना उभारुन सुरेश पाटील यांनी देखील यामध्ये जम बसविला आहे. शिवाय भाजपचे दत्ता कुलकर्णी यांचा देखील गुळ पावडर कारखाना सूरु होत आहे. हे काही छोटे अपवाद वगळता राजकीय नेत्यांनी कारखानदारीकडे पुर्णत दुर्लक्ष केल्याचे दिसुन येत आहे.

मतदारसंघात असलेल्या कारखान्यावर ते लक्ष केंद्रीत करतात हे काही उदाहणावरुन लक्षात येते. स्वतःनसलो तरी जवळच्या लोकांकडे कारखाना असावा यासाठी राजकीय मंडळी नेहमीच पुढाकार घेतात.धाराशिव कारखाना आमदार कैलास पाटील यांचे भाच्चे अभिजीत पाटील यांच्याकडे असल्याने त्यांची राजकीय सोय होते.शिवाय कंचेश्वर व आता तुळजाभवानी हे दोन्ही कारखाने सुनिल चव्हाण यांच्या जवळच्या व्यक्तीकडेच आहेत.

अशाचप्रकारे अनेक कारखान्यामध्ये राजकीय सोय करुन ठेवली जाते पण स्वतःराजकीय नेते कारखानदारीमध्ये जात नसल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. सध्या जिल्ह्याच्या कारखानदारीवर सर्वाधिक पकड मिळवुन प्रा.तानाजी सावंत यानी बाजी मारली आहे. यापुढील काळात त्यांना राजकीय दृष्ट्याही त्याचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT