पाटील, फडणवीसांपाठोपाठ शरद पवारही दिल्लीत! नेमकं कारण काय?

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) हे दोघेही सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.
Sharad Pawar
Sharad Pawar sarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघेही सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. मात्र या नेत्यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही (Sharad Pawar) दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलही असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

परंतु शरद पवार आणि भाजप नेत्यांच्या दौऱ्यांचा कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे. आज दुपारी अडीच वाजता संसदेच्या डिफेन्स कमिटीची बैठक होत आहे. शरद पवार या कमिटीचे सदस्य आहेत. त्यामुळे या बैठकीसाठी ते दिल्लीत दाखल झाले असल्याचे माहिती आहे.

Sharad Pawar
चंद्रकांत पाटलांपाठोपाठ फडणवीस दिल्लीत; मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत?

चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली दौऱ्यात कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. आज सकाळी चंद्रकांतदादांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीत दाखल झाले. फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याचे कारण अद्याप पुढे न आल्याने भाजपच्या गोटात नेमकं चाललयं काय यावर चर्चा सुरु झाली आहे. यातून काही मोठ्या राजकीय घडामोडी घडणार का? असाही सवाल विचारला जात आहे. या दोन्ही नेत्यांची बी एल संतोष यांच्याशी बैठक सुरु आहे.

चंद्रकांत पाटील-अमित शहा ही भेट प्रामुख्याने संघटनात्मक कामांसाठी असल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात येत आहे. राज्यातील महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भाने शहा यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीत निवडणूकीच्या तयारीचा भाग म्हणून पक्षातील काही संघटनात्मक बाबीवर पाटील यांनी शहा यांना माहिती दिली आहे. तसेच विधानपरिषदेच्या ६ जागा बिनविरोध करण्याच्या काँग्रेसच्या प्रस्तावावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Sharad Pawar
चंद्रकांत पाटील यांच्याशी अमित शाह काय बोलले ?

आज देवेंद्र फडणवीस यांची भेटही सध्याच्या राजकीय घडामोडी आणि काँग्रेसचा प्रस्ताव यावर चर्चा करण्यासाठी असल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. आज विधानपरिषदेचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यात मुंबईच्या दोन जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ४ जागाही बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसने प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच प्रस्तावावर फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या नवीन शिवतीर्थ या निवासस्थानी जावून भेट घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्राच मनसे-भाजप युती होणार असल्याच्या चर्चांना गती आली होती. त्यामुळे मनसे-भाजप युतीवर दिल्लीत खलबत सुरु आहेत का? अशी चर्चा रंगली आहे. याशिवाय आणखी कोणत्या गोष्टीवर चर्चा होवून काही मोठी राजकीय घडामोड घडणार आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com