Mp Sanjay Jadhav-MLA Ratnakar Gutte News  Sarkarnama
मराठवाडा

MP Sanjay Jadhav MLA Gutte Struggle : गंगाखेडची शुगर होतेय कडू, जाधव-गुट्टेंमध्ये संघर्ष..

Prasad Shivaji Joshi

Parbhani Political News : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे खरेतर संत जनाबाई यांचे जन्मस्थान, पेठ्याची कलम आणि पारंपारिक दसरा यासाठी प्रसिद्ध. मात्र राज्याच्या राजकीय पटलावर गंगाखेड विधानसभेची निवडणूक हा कुतूहलाचा विषय झाला आहे. (RSP News) परभणीचे खासदार संजय जाधव आणि गंगाखेडचे विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यातील संघर्षामुळे सध्या गंगाखेड चर्चेचा विषय बनले आहे.

सर्वात प्रथम गंगाखेड विधानसभा निवडणुक चर्चेला आली ती निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर होत असल्यामुळे. (MLA Ratnakar Gutte) मतदारांना पैसे वाटप करताना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना पकडण्यात आले आणि पोलिसांनी तेव्हा त्यांना अटकही केली होती. (Sanjay Jadhav) निवडणुकीत पैशाचा वापर करण्याचे प्रकार राज्यात सर्वत्र होत असले तरी गंगाखेड मात्र नेहमीच आघाडीवर असल्याचे बोलले जाते.

२०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष गंगाखेड विधानसभा मतदारसंघाकडे वेधले गेले. (Parbhani News) कारण उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी तुरुंगात असताना निवडणूक लढवली आणि त्यांनी विजयही संपादन केला. गंगाखेड शुगर्स लि. ने शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्जे उचलल्याच्या प्रकरणात त्यांना अटक झाली होती. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाच्या माध्यमातून परभणी शहरात सक्रीय असलेले गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश पदाधिकारी आहेत.

मागील काळात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मित्र मंडळाच्या माध्यमातूनच त्यांनी राजकारण केले. परभणी शहरातील खड्ड्यांना ठाकरे गटाचे खासदार व आमदार जबाबदार आहेत, असा आरोप गुट्टे यांनी केला आणि वादाची ठिणगी पडली. त्याला प्रत्युत्तर देताना जाधव यांनी गुट्टे यांच्यावर आरोप करताना गंगाखेड शुगर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलून त्यांची फसवणूक करण्यात आल्याची आठवण त्यांना करून दिली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर हाच मुद्दा घेऊन गंगाखेड येथे शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजनही केले. करण्यात आले.

महायुतीला लाभ...

परभणी जिल्ह्यात संजय जाधव व आमदार डॉ.राहुल पाटील हे ठाकरे गटाचे तर पाथरी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर, राष्ट्रवादी (शरद पवार गट) राज्यसभेचे सदस्य खासदार फौजिया खान व विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी हे महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी आहेत. जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर व गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे हे महायुतीचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीचा पारडे जड मानले जाते. मात्र गुट्टे यांनी ठाकरे गटाचे खासदार जाधव यांनाच थेट आव्हान दिल्याने महायुतीच्या समर्थकात उत्साह निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तूर्तास तरी गंगाखेडची शुगर कडू होताना दिसते आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT