Parbhani Politics : पंकजा मुंडेंच्या खासगी दौऱ्याला परभणीत ठाकरे गटाचे बळ..

Pankaja Munde News : याउलट भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये फारसा उत्साह जाणवला नाही.
Parbhani Political News
Parbhani Political NewsSarkarnama

Shivsena UBT News : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा नुकतीच परभणी जिल्ह्यात आली होती. यावेळी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी पंकजा मुंडेंचे जोरदार स्वागत केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Parbhani Political News) पंकजा मुंडे यांनी महिनाभराची राजकीय सुट्टी घेतली होती. राजकीय क्षेत्रात पुन्हा सक्रीय होताच त्यांनी शिवशक्ती परिक्रमा हा खासगी दौरा सुरु केला.

Parbhani Political News
Parbhani NCP News: परभणीत राष्ट्रवादीची घडी विस्कटली; पुढे आणखी धक्के बसणार...

यात प्रामुख्याने देवदर्शन हा हेतू असला तरी यानिमित्ताने ठिकठीकाणी होत असलेला सत्कार व कार्यक्रम हे पक्षाच्या समांतर स्वत:ची राजकीय ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. (Pankaja Munde) त्यामुळे शिवशक्ती परिक्रमा ही देवदर्शन साठी आहे की शक्तीप्रदर्शनासाठी ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. परभणी जिल्ह्यात या यात्रेचे आगमन होताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी पंकजा मुंडेंचे जोरदार स्वागत केले.

याउलट भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये फारसा उत्साह जाणवला नाही. (Marathwada) माजी आमदार मोहन फड यांनी केलेल्या स्वागतप्रसंगी ग्रामीण जिल्हाध्यक्ष वगळता अन्य पदाधिकारी फिरकले नाहीत. वास्तविक भारतीय जनता पक्षाने येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरु केली असून राज्यातील प्रत्येक लोकसभा व विधानसभा मतदारसंघात समन्वयक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

नियुक्त झालेले समन्वयक हेच त्या मतदारसंघातील उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र परभणी विधानसभेचे समन्वयक आनंद भरोसे यांनी पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. तसेच शहरात प्रदेश कार्यकारिणी सदस्य, महिला आघाडीच्या पदाधिकारी असून यापैकी कोणीही पंकजा मुंडे यांच्या स्वागतप्रसंगी उपस्थिती लावली नाही. तर भारतीय जनता पक्षाचे जवळपास सर्वच राष्ट्रीय पदाधिकारी जी २० परिषदेच्या प्रचार प्रसारात व्यस्त असताना पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पेजवर यासंबंधी एकही पोस्ट दिसून आली नाही.

दिवंगत गोपीनाथ मुंडे हे मराठवाड्याचे नेतृत्त्व होते, त्यांचे कायम सहकार्य लाभले आहे ते कधीही विसरता येणार नाही. मुंडे परिवाराशी स्नेह हा राजकारणा पलीकडचा आहे. आज त्यांच्या कन्या व माझ्या बहिण पंकजाताई परभणीत आल्यानंतर त्यांचे स्वागत करून आनंद झाला, अशा भावना खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केल्या होत्या. राज्यातील बदलते राजकीय समीकरण, शिवसेनेत पडलेली फूट आणि भाजप नेतृत्वाकडून पंकजा यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण यामुळेच पंकजा यांच्या दौऱ्याला परभणीत ठाकरे गटाने बळ दिल्याचे बोलले जाते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com