Marathwada Sugarcane News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Sugarcane FRP : तीन हजार `एफआरपी` साठी अमित देशमुखांच्या खासगी कारखान्याचे गाळप बंद पाडले..

Laxmikant Mule

Nanded Political News : मराठवाड्यात ऊस एफआरपीचा प्रश्न तापत असुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री अमित देशमुख यांच्या खासगी कारखान्यांचे गाळप बंद पाडले आहे. (Marathwada Sugarcane News ) येणाऱ्या काळात ऊसदराच्या प्रश्नावर मराठवाड्यात वातावरण तापण्याची चिन्हे दिसून येत असून, याची पहिली ठिणगी गुरुवारी (ता १६) पडली आहे.

यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन पंधरा दिवस झाले आहेत. यंदाची दुष्काळी परिस्थिती व‌ ऊस टंचाई लक्षात घेता यावेळी पहिली उचल दोन ७०० तर अंतिम भाव तीन हजार देण्यात यावा यासाठी स्वभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. (Amit Deshmukh) या मागणीसाठी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. अमित देशमुख यांच्या मालकीच्या `ट्वेन्टी वन शुगर शिवडी` (ता. लोहा जि. नांदेड ) (Marathwada) येथे खासगी साखर कारखाना आहे.

या कारखाना परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटना, ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी उसाला प्रतिटन २७०० रुपये एकरकमी एफआरपी जाहीर करावी या मागणीसाठी गुरुवारी सकाळी ठिय्या आंदोलन सुरू केले ते रात्री उशिरापर्यंत चालू होते. (Sugarcane FRP) स्वाभिमानी शेतकरी संघटना, ऊस उत्पादक शेतकरी व कारखाना प्रशासन यांच्यात चर्चा झाली पण तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच आहे.

शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक करणारे वाहने रोखून धरल्याने गाळप बंद पडले आहे. हे ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशी ही सुरूच आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे यांनी दिली. दरम्यान, यंदाच्या गाळप हंगामात मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या एफआरपीपेक्षा दोनशे रुपये प्रति टन जादा देण्याची मागणी शिवसेना शेतकरी नेते तथा ऊस नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य (शिवसेना शिंदे गट) प्रल्हाद इंगोले यांनीही केली आहे.

यंदाच्या गाळप हंगामात ऊसाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली आहे. तर कारखाना प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस दुसऱ्या कारखान्यांनी पळून नेऊ नये यासाठी विशेष दक्षता घेत आहेत. नांदेड विभागात येणाऱ्या नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या चार जिल्ह्यांतील २९ साखर कारखान्यांना ऊस गाळपाचा परवानगी देण्यात आली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT