BJP MLA Suresh Dhas Advise Maratha-OBC Leader News Sarkarnama
मराठवाडा

Suresh Dahs : हैदराबाद गॅझेटचा रिझल्ट तर येऊ द्या; आधीच 'हलकल्लोळ' कशाला ? सुरेश धस यांचा 'सबुरी'चा सल्ला

Suresh Dhas Advise On Hyderabad Gazette: देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा घेतलेला निर्णय विचारपूर्वक आणि कोणत्याही समाजाच्या आरक्षणावर अन्याय करणारा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Jagdish Pansare

1. हैदराबाद गॅझेटचा निकाल येण्याआधीच राजकारणात होणाऱ्या गोंधळावर सुरेश धस यांनी टीका केली.

2. संयम ठेवून निकालाची वाट पाहण्याचा मराठा आणि ओबीसींच्या नेत्यांना सल्ला दिला.

3. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवण्याचेही धस यांचे आवाहन

Maratha-OBC Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. या गॅझेट लागू करण्याच्या निर्णयानंतर ओबीसी समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. यावरून राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भडकला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांना एक सल्ला दिला.

हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय त्याचा किती परिणाम होतो याचा रिझल्ट अद्याप लागलेला नाही. त्याआधीच दोन समाजांनी आपापल्या पद्धतीने त्याचे अर्थ काढून 'हलकल्लोळ'करणे योग्य नाही. सोशल मिडिया आणि रस्त्यावर एकमेकांच्या विरोधात उतरण्याची भाषा योग्य नाही. सध्या 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत राहून मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाच्या नेत्यांनी सबुरीने घ्यावे, असा सल्लाही सुरेश धस (Suresh Dhas) यांनी दिला.

ओबीसीचे नेते प्रा.लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी आक्रस्ताळेपणा कमी करून बुद्धिवाद्यांप्रमाणे आपली मते मांडवीत. दांडके घेण्याची भाषा, तुला बघून घेईन असे, म्हणणे चुकीचे आहे. विधानसभा निवडणुकीत तुम्ही सगळ्या मतदारसंघात फिरलात, गेवराईमध्ये तुमची मते त्यांच्या झोळीत टाकली मग आता विजयसिंह पंडित यांच्या विरोधात दांडुक्याची भाषा कशाला? असा सवालही हाकेंना केला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा घेतलेला निर्णय विचारपूर्वक आणि कोणत्याही समाजाच्या आरक्षणावर अन्याय करणारा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या निर्णयाचा प्रत्यक्षात काय परिणाम होतो? किती कुणबी नोंदी सापडतात? किती लोकांना लाभ होतो हे अद्याप स्पष्ट झालेली नाही.

असे असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर अविश्वास दाखवायचा आणि आमचे आरक्षण संपले असे म्हणत दोन्ही बाजूंनी टोकाची भूमिका घेणे चुकीचे आहे. यातून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत आहे, अशावेळी माझे दोन्ही समाजाच्या नेत्यांना आवाहन आहे की त्यांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका स्वीकारावी. लक्ष्मण हाके यांनी मराठा महिलांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दलही सुरेश धस यांनी नाराजी व्यक्त केली.

शिवाय त्यावरून रान उठवणाऱ्यांनाही त्यांनी शांत राहण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्र राज्य हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांवर चालते. तसेच राज्यात यापूर्वी आंतरजातीय विवाह झालेले नाहीत का? त्यामुळे ज्याला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे ते निर्णय घेतील, असेही सुरेश धस म्हणाले.

FAQ

1. सुरेश धस यांनी हैदराबाद गॅझेटबद्दल काय म्हटले?
त्यांनी संयम ठेवण्याचा सल्ला देत आधीच होत असलेल्या गोंधळाची टीका केली.

2. धसांनी गॅझेट प्रकरणात संयमावर भर का दिला?
त्यांच्या मते निकालाची वाट पाहणे हे गोंधळ घालण्यापेक्षा योग्य आहे.

3. त्यांच्या विधानाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम झाला?
त्यामुळे राजकीय वर्तुळात नवे वाद व प्रतिक्रिया उमटल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT