Suresh Dhas : एका नेत्याची विकेट पडली, अगदी क्लीन बोल्ड! सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना डिवचले

Beed Leader MLA Suresh Dhas-Dhananjay Munde Clash : भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपद गेल्याची का करून दिली आठवण?
MLA Suresh Dhas And Dhananjay Munde Clash News Beed
MLA Suresh Dhas And Dhananjay Munde Clash News BeedSarkarnama
Published on
Updated on
Summary

Summary

1.सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत क्रिकेटची उपमा दिली.

2. एका नेत्याची विकेट पडली, अगदी क्लीन बोल्ड” असे म्हणत त्यांनी राजकीय वातावरण तापवले.

3. बीडच्या राजकारणात सक्रीय झालेल्या धनंजय मुंडे यांचे खच्चीकरण करण्याचा धसांकडून प्रयत्न.

Beed Political News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे खंडणीच्या वादातून अपहरण आणि त्यानंतर निर्दयीपणे करण्यात आलेल्या हत्या प्रकरणाचा फटका तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांना बसला. मुंडे यांचा विश्वासू सहकारी असलेल्या वाल्मीक कराड याचा या हत्या प्रकरणात हात असल्याचे समोर आल्याने विरोधकांनी धनंजय मुंडे यांची कोंडी केली होती. विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे सरकारला धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागला होता.

त्यांच्या राजीनाम्याने विरोधकांचा राजकीय विजय झाला, यात महत्त्वाची भूमिका भाजपाचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी निभावली होती. काल मतदार संघातील एका सत्कार कार्यक्रमात धस यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टोलेबाजी केली. जिल्ह्यातल्या एका मोठ्या नेत्याची विकेट पडली ती देखील अगदी क्लीन बोल्ड, असे म्हणत धस यांनी धनंजय मुंडे यांना डिवचले.

बीड (Beed News) जिल्ह्याच्या राजकारणात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष गेल्या काही महिन्यात पाहायला मिळाला. ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनामुळे राज्यभरात मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. मुंबईतील आझाद मैदानावर पाच दिवसाचे उपोषण यशस्वी होऊन हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जीआर काढला. त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष नव्याने सुरू झाला आहे.

MLA Suresh Dhas And Dhananjay Munde Clash News Beed
Suresh Dhas Crime:सुरेश धस अडचणीत,बीडमधूनच गंभीर आरोप ? 12000 रुपयांसाठी समर्थकांकडून अपहरण अन् लोखंडी रॉडनं मारहाण

या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस यांनी आपल्या मतदार संघातील एका पेढे तुला कार्यक्रमात भाषणामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण, त्यातील आरोपी वाल्मीक कराड आणि त्यांच्याशी असलेल्या जवळि‍केतून जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याची विकेट कशी पडली? याचा उल्लेख केला. धस यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख कोणाकडे होता हे स्पष्ट होते.

MLA Suresh Dhas And Dhananjay Munde Clash News Beed
Dhananjay Munde News : मराठा आरक्षणासाठी बलिदान, नितीन चव्हाण यांच्या कुटुंबाला धनंजय मुंडेंकडून मदतीचा हात!

सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरेश धस, मनोज जरांगे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चामध्ये केंद्रस्थानी होते ते आमदार सुरेश धस. आपल्या भाषणातून त्यांनी त्यावेळी जिल्हा नियोजन समिती मध्ये निधीचा झालेला घोटाळा, कृषी विभागात साहित्य खरेदीत झालेला कोट्यावधीचा घोटाळा, अशी अनेक प्रकरण बाहेर काढत धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढवला होता.

अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यापूर्वी धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून पायउतार केले.तेव्हापासून धनंजय मुंडे काही काळ राजकारणापासून दूर गेले होते. मात्र राज्यात राजकीय परिस्थिती बदलू लागली तसे मुंडे पुन्हा सक्रिय झाले. मराठा आरक्षणाची मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकारने मान्य करत हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात काढण्यात आलेल्या जीआरवरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले.

ओबीसी नेत्यांनी या विरोधात न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी सुरू केली. दुसरीकडे हैदराबाद गॅझेटचाच आधार घेत आदिवासी, बंजारा, महादेव कोळी व इतर समाजांनी आपल्याला 'एसटी'चे आरक्षण मिळावे, अशा मागणीचा रेटा लावला आहे. या मागणीसाठी ओबीसी समाजातील काही तरुणांनी आपले जीवन संपवल्याच्या घटनाही मराठवाड्यात समोर आल्या आहेत. अशावेळी धनंजय मुंडे सक्रिय झाले आहेत.

धनंजय मुंडे यांची विकेट पडली आणि ती देखील क्लीन बोल्ड याची आठवण करून देत भाजप आमदार सुरेश धस त्यांना इशारा देऊ पाहत आहेत का? अशी चर्चा या निमित्ताने होऊ लगाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये जिल्ह्यातील धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस यासह सर्वांचा कस लागणार आहे. त्यामुळे आतापासूनच एकमेकांवर कुरघोडी करत आपापले मतदारसंघ आणि तेथील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात ठेवण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र आहे.

FAQ

1. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेबद्दल काय म्हटले?
त्यांनी टोला मारत एका नेत्याची विकेट पडली, अगदी क्लीन बोल्ड असे म्हटले.

2. धसांनी राजकारणाची तुलना क्रिकेटशी का केली?
मुंडे यांच्या राजकीय पराभवाचा उपरोधिक उल्लेख करण्यासाठी.

3. धसांच्या विधानाचा काय परिणाम झाला?
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद आणि तणाव निर्माण झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com