Satish Bhosle Suresh Dhas Sarkarnama
मराठवाडा

Beed Court News: सुरेश धस यांचा निकटवर्तीय सतीश भोसले उर्फ 'खोक्या'ला मोठा दिलासा, बॅटनं मारहाण प्रकरणी निर्दोष मुक्तता

Beed Court News: बीड जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सतीश उर्फ खोक्या भोसले याची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. सतीश भोसले याची ओळख भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता अशी होती.

Jagdish Pansare

Beed District Court : बीड जिल्ह्यातील शिरूर परिसरात एका व्यक्तीला क्रिकेट बॅटने बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडिओ दीड वर्षापूर्वी सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. यातील मुख्य आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या याच्यासह सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या संदर्भातील खटल्यात बीड जिल्हा सत्र न्यायालयात नुकतीच अंतीम सुनावणी पार पडली. ​15 महिन्यांनंतर न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

बीड जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सतीश उर्फ खोक्या भोसले याची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. सतीश भोसले याची ओळख भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता अशी होती. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीडमधील गुन्हेगारी, राजकीय संबंध आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरूनही त्याचे प्रकरण चर्चेत आले होते.

या शिवाय शिरूर कासार परिसरातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश यांना मारहाण केल्याचा आरोपही त्याच्यावर होता. या प्रकरणात एप्रिल 2026 मध्ये पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता याधीच झाली आहे.

बॅटने मारहाण प्रकरणाशिवाय खोक्यावर हरीण, मोर आदी वन्यजीवांच्या शिकारीचे आरोप झाले होते. वनविभागाने त्याच्या घरावर छापा टाकून शिकारीशी संबंधित साहित्य आणि मांस जप्त केले होते.

आता शिरूर कासार परिसरात एका व्यक्तीला क्रिकेटच्या बॅटने अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात 15 ते 16 महिने न्यायालयीन प्रक्रिया, सुनावणी पार पडल्यानंतर खोक्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ नेमका कुठून आला, तो कोणी चित्रित केला आणि त्याची सत्यता काय? याबाबत आवश्यक पुरावे न्यायालयासमोर सादर झाले नाही.

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती म्हणजेच सतीश भोसले आणि त्याचे साथीदार आहेत, हे सिद्ध करणारा ठोस पुरावा न्यायालयासमोर आला नाही. आरोपींनीच संबंधित व्यक्तीला मारहाण केली, हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुराव्यांची साखळी सरकारी पक्षाला पूर्ण करता आली नाही. त्यामुळे आरोपींना संशयाचा लाभ मिळाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT