

Balasaheb Thackeray Photo Controversy : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र 'बिलॉंगिंग'वर हल्लाबोल करताना, एकनाथ शिंदे शिवसेनेने ते भर पत्रकार परिषदेत फाडले. त्यातील फोटो देखील फाडले. पण हीच कृती आता एकनाथ शिंदे शिवसेनेच्या अंगलट आली आहे. पुस्तक आणि त्यातील फोटो फाडताना, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या शायना एनसी यांच्याकडून हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अवमान झाला.
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या या कृतीवर राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष राज्यात चांगलाच आक्रमक झाला आहे. सोनिया गांधी यांचे पुस्तक फाडल्याने काँग्रेस देखील निषेध व्यक्त करत आहेत. या कृतीने एकनाथ शिंदे शिवसेना चांगलीच डॅमेज झाली असून, यातून सावरण्यासाठी शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मैदानात उतले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोच्या अवमानावर सावरासावरी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी सोनिया गांधी यांच्या पुस्तकात चुकीचे लिहिले आहे, काँग्रेस वेळोवेळी सावरकरांविरोधात, चुकीची भूमिका घेत आहे. त्याविरोधात शिवसेनेत नाराजी आहे. ती व्यक्त करताना, ही कृती अवधानातून झाली आहे, असे सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी, शायना एनसी यांनी फाडलेल्या छायाचित्रावर सावरासावरी केली. मी स्वतः ते छायाचित्र पाहिले आहे. त्या छायाचित्रात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) दिसत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यामुळे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांना चपलेने मारण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली होती. संबंधित छायाचित्रात जो भाग फाडलेला दिसत आहे, तो मणिशंकर अय्यर यांचा चेहरा होता, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्यात आला आहे. शिवसेनेने त्या पुस्तकातील आक्षेपार्ह दोन पाने फाडून आपला निषेध व्यक्त केला आहे. सावरकरांचा काँग्रेसकडून नेहमीच अवमान करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. राहुल गांधी सातत्याने सावरकरांची बदनामी करत आहेत. ज्या व्यक्तीने देशासाठी प्रचंड यातना आणि हालअपेष्टा सहन केल्या, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाणीवपूर्वक अपमान केल्याबद्दल मी राहुल गांधींचा निषेध करतो. तसेच, त्यांच्यासोबत सत्तेत बसून घनिष्ठ युती करणाऱ्यांचाही निषेध करतो, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेशी फारकत घेतलेल्यांचाही मी धिक्कार करतो, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षावर देखील नाव न घेता टीका केली. हे स्पष्ट असले पाहिजे की, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या कोणाचाही निषेध केला जाईल. त्याविरोधात आंदोलन आणि निदर्शनेही केली जातील, असाही इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. ते आमचे आदर्श आहेत. आम्ही त्यांची विचारधारा पुढे घेऊन जात आहोत. त्यांचा कोणताही अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही. त्यांना अपमानित करण्याची परवानगी कोणालाही दिली जाणार नाही, असे सांगून बाळासाहेब ठाकरे यांचा कोणत्याही प्रकारे अनादर किंवा अपमान करणे पूर्णपणे असह्य आहे. असा प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही, अशीही भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडत पत्रकार परिषदेत प्रवक्त्यांनी, विशेष करून शायना एनसी यांनी केलेल्या कृतीवर सावरासावर केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.